आई बाथरूममध्ये गेली, बाहेर येईपर्यंत भावानेच 'त्या' कारणावरून बहिणीचा गळा चिरला
Crime News : भावानेच आपल्या बहिणीची त्या एका कारणावरून हत्या केली. त्या हत्येचं कारण आता समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आई बाथरूमला गेली
बाहेर येईपर्यंत लेकीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
Crime News : उत्तर प्रदेशातील आलियापूर गावात भाऊ आणि बहीण यांच्यात काहीतरी बोलणं सुरु होतं. पण काही वेळानंतर त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, त्यांची आई, हुकुम देवी बाथरूममध्ये गेली होती. हुकुम देवी यांना कसलीही कल्पना नव्हती ती की बाथरूममधून बाहेर येईपर्यंत लेकीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असेल. मृत झालेल्या तरुणाचे नाव संयोगिता (वय 32) असे आहे.
हे ही वाचा : दोन वर्षांपासून जीवापाड प्रेम, नंतर पळून जाऊन केलं लग्न, IAS अधिकाऱ्याच्या मुलीचा बाथरूममध्ये मृतदेह
मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
हुकुम देवी बाथरूममधून बाहेर येताच तिला तिची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात दिसली. खरं तर, संयोगिताची हत्या तिचाच भाऊ श्योराजने केली. त्याने तिचा गळा चिरून हत्या करत क्रूरपणे संपवलं. हे चित्र पाहून आईच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेनं गाव हादरून गेले आहे.
मालमत्तेच्या वादावरून हत्या?
कुटुंबात काही काळापासून मालमत्तेचा वाद सुरु होता. एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, वडील भगवान दास यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यानंतर संयोगिता ही नर्स म्हणून काम करत होती, ती संपत्तीचा वाटा मागत होती. या मुद्द्यावरून तिचा तिच्या भावाशीच वाद झाला होता. भाऊ आपल्या बहिणीला संपत्तीचा वाटा देण्यासाठी विरोध करत होता. याचमुळे त्याने आपल्या बहिणीची हत्या केली.
हे ही वाचा : Astrology : काही राशीतील लोकांना लाभणार प्रेमाचा सहवास, 'या' राशीतील लोकांंना समाजात मिळणार स्थान
मृत महिलेच्या आईने तिच्याच मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याने घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच त्याच्या मुसक्या आवळल्या जातील असं पोलिसांचं म्हणणं आहे.










