दोन वर्षांपासून जीवापाड प्रेम, नंतर पळून जाऊन केलं लग्न, IAS अधिकाऱ्याच्या मुलीचा बाथरूममध्ये मृतदेह

मुंबई तक

Crime News : एका आयएस अधिकाऱ्याच्या 25 वर्षीय मुलगी माधुरी साहिताबाई हिने तिच्या राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवलं. काही महिन्यापूर्वी तिने हुंड्यासाठी छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला होता, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय घडलं? 

point

मुलीच्या माहेरी मृतदेह आढळला 

Crime News : एका आयएस अधिकाऱ्याच्या 25 वर्षीय मुलीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. माधुरी साहिताबाई (वय 25) असं तिचं नाव आहे. माधुरी साहिताबाईने टोकाची भूमिका उचलण्यामागचं कारण आता समोर आलं आहे. तिने काही महिन्यापूर्वी हुंड्यासाठी छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला होता, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील ही अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. 

हे ही वाचा : Astrology : काही राशीतील लोकांना लाभणार प्रेमाचा सहवास, 'या' राशीतील लोकांंना समाजात मिळणार स्थान

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी साहिताबाई दीर्घकाळ बाथरूममध्येच होत्या. बराच वेळ झाला त्या बाहेरच आल्या नसल्याने कुटुंबीयांनी त्याचक्षणी बाथरूमचा दरवाजा तोडला. बाथरूमचा दरवाजा उघडल्यानंतर त्यात माधुरी साहिताबाईचा मृतदेह आढळून आला होता, 

मुलीच्या माहेरी मृतदेह आढळला 

या प्रकरणात मांगल्यागिरीचे डीएसपी मुरली कृष्णा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, आयएएस अधिकाऱ्याची मुलगी माधुरी साहिताबाई हिचा तिच्या माहेरील घरात मृतदेह आढळला होता. आपल्या सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप तिने केला होता. 

बीएनएसच्या कलम 80 अंतर्गत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. साहिताबाईवरील हुंड्यासाठी होणारा छळ करणीभूत होता का, या दृष्टीने पोलीस आता कसून चौकशी करत असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी तपास करत सांगितलं की, साहिताबाईचा राजेश नायडू याच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची माहिती पतीच्या कुटुंबियांना दिली होती. नंतर हा विवाह नोंदणीकृत करण्यात आला असल्याचं तपासातून समोर आलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp