भावजयीने नणंदबाईला संपवले, दगडाने ठेचून केला खून; जमिनीच्या वादातून टोकाचं पाऊल

Crime News : नणंद भावजयीचा वाद हा काही नवीन नाही. दोघींमध्ये सतत कलगीतुरा असल्याचे पहायला मिळते. मात्र एका प्रकरणात हा वाद टोकाल गेला आणि भावजयीने आपल्या 40 वर्षीय नणंदेचा खूनच केला. या कुटुंबात काही काळापासून जमिनीमुळे वाद विवाद सुरु होते. मात्र हा वाद इतक्या टोकाला पोहोचेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. धक्कादायक म्हणजे ही हत्या करण्यात मृत महिलेच्या भाचीचादेखील समावेश होता.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:33 AM • 12 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

भावजयीने नणंदबाईला संपवले

point

दगडाने ठेचून केला खून

point

जमिनीच्या वादातून टोकाचं पाऊल

Crime News : नणंद भावजयीचा वाद हा काही नवीन नाही. दोघींमध्ये सतत कलगीतुरा असल्याचे पहायला मिळते. मात्र एका प्रकरणात हा वाद टोकाल गेला आणि भावजयीने आपल्या 40 वर्षीय नणंदेचा खूनच केला. या कुटुंबात काही काळापासून जमिनीमुळे वाद विवाद सुरु होते. मात्र हा वाद इतक्या टोकाला पोहोचेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. धक्कादायक म्हणजे  ही हत्या करण्यात मृत महिलेच्या भाचीचादेखील समावेश होता. झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यातील ही घटना आहे. संझली हांसदा असं मृत महिलेचे नाव आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Hardik Pandya आणि Mahika Sharma विरोधात पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

दगडाने केला हल्ला

बुधवारी (11 मार्च) सकाळी संझली हांसदा आणि तिची चुलत भावजयी मंझली मुर्मू तसेच पुतणी तारा हांसदा यांच्यात जमिनीवरून कडाक्याचे भांडण झाले. वादाचे स्वरूप इतके गंभीर झाले की, दोन्ही बाजूंनी एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की सुरू झाली. याच दरम्यान रागाच्या भरात भावजयी आणि भाची तारा यांनी मिळून संझलीवर दगडाने जोरदार हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात संझलीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हत्येसाठी वापरलेला दगडही जप्त केला आहे.

जमिनीचा जुना वाद

मृत महिलेचा भाऊ मनिंदर हांसदा याने सांगितले की, दोन्ही कुटुंबांमध्ये जमिनीचा वाद जुनाच होता. यापूर्वीही अनेकदा त्यांच्यात हाणामारी झाली होती आणि हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतही पोहोचले होते. प्रशासकीय स्तरावर जमिनीची मोजणीही करण्यात आली होती, मात्र तरीही हा वाद पूर्णपणे मिटला नव्हता. याच वादाने अखेर एका महिलेचा बळी घेतला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे.

हे ही वाचा : तीन मुली झाल्या, दुसरं लग्न करण्याची परवानगी दे, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

आरोपीला अटक

या प्रकरणात पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भावजयी आणि पुतणीला ताब्यात घेतले आहे. तर घरातील इतर चौघांवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीनीच्या वादातून झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ  उडाली आहे.

    follow whatsapp