ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 18 वर्षानंतर लग्नासाठी आणला दबाव अखेर...

Bhiwandi Crime : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एका 20 वर्षीय टेलरींगचं काम करणाऱ्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला, तसेच तिला ब्लॅकमेल करत आणि मागील महिन्यात ती 18 वर्षांची झाल्यानंतर दुसर्‍या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकरणात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मध्यस्ती केली असता, पोलिसांनी आरोपी शिंपी तरुणाला अटक केली. 

Bhiwandi Crime

Bhiwandi Crime

मुंबई तक

• 03:04 PM • 11 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुण आणि अल्पवयीन मुलगी सोशल मीडियावर भेटले

point

अल्पवयीन असल्याचा फायदा घेत मुलीशी दोन वर्षे शारीरिक संबंध

Bhiwandi Crime : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एका 20 वर्षीय टेलरींगचं काम करणाऱ्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला, तसेच तिला ब्लॅकमेल करत आणि मागील महिन्यात ती 18 वर्षांची झाल्यानंतर दुसर्‍या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकरणात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मध्यस्ती केली असता, पोलिसांनी आरोपी शिंपी तरुणाला अटक केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Stuti Sonawane Suicide Case : ताज हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन, आनंदी ठेवलं, पण अचानक फैजुलचा स्वभाव बदलला

तरुण आणि अल्पवयीन मुलगी सोशल मीडियावर भेटले

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. 2024 मध्ये तरुण आणि अल्पवयीन मुलगी सोशल मीडियावर भेटले होते. आरोपीविरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सांगितले की, टेलरींगचं काम करणारा तरुण आणि अल्पवयीन मुलगी 2024 मध्ये सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी जोडले गेले. 

अल्पवयीन असल्याचा फायदा घेत मुलीशी दोन वर्षे शारीरिक संबंध

पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने तिच्या अल्पवयीन असल्याचा फायदा घेत तिच्याशी दोन वर्षे शारीरिक संबंध ठेवले. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिच्यावर लग्नास दबाव आणला होता. मुलगी 6 मार्च रोजी भिवंडी येथे गेली होती. लग्न समारंभासाठी होण्यापूर्वीच तिच्या नातेवाईकांनी एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहिती दिली होती. नंतर कार्यकर्त्यांनी विवाहास्थळी दाखल होत हल्ला केला. नंतर मुलीची सुटका केली आणि तरुणाला स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केले. 

हे ही वाचा : शेळ्या चरायला घेऊन गेलेल्या मुलीवर झुडपात सामूहिक अत्याचार, पीडित तरुणी शेतात आढळली

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, शारीरिक संबंध सुरु झाल्यानंतर तिच्यावर वारंवार दबाव आणण्यात आला, तसेच विवाहानंतर ब्लॅकमेल केलं जात आहे. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत. 

    follow whatsapp