नराधम शेजाऱ्याने दिव्यांग माय-लेकाला संपवले; हत्येपूर्वी आईवर बलात्कार, नंतर मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडवून खून

Crime News : एका दिव्यांग माय-लेकाच्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. ही हत्या एका नराधम शेजाऱ्यानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने हत्येपूर्वी महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपीने हे क्रूर पाऊल उचलले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 04:22 PM • 11 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नराधम शेजाऱ्याने दिव्यांग माय-लेकाला संपवले

point

हत्येपूर्वी आईवर बलात्कार

point

नंतर मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडवून खून

Crime News : एका दिव्यांग माय-लेकाच्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. ही हत्या एका नराधम शेजाऱ्यानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने हत्येपूर्वी महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपीने हे क्रूर पाऊल उचलले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी ओल्या कपड्यांनिशी घटनास्थळावरून पळून जाताना स्पष्टपणे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ मधील हे प्रकरण आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई : मानखुर्दमध्ये फालुदा विक्रेत्याची चाकूने सपासप वार करुन हत्या, हादरवून टाकणारं सीसीटीव्ही फुटेज समोर

आईचा आवाज ऐकून दिव्यांग मुलगा धावला

पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला असून तिच्यावर बलात्कार झाल्याचीही पुष्टी झाली आहे. तर तिच्या अंध मुलाचा मृत्यू गळा दाबल्यामुळे आणि पाण्यात बुडवल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीने घरात घुसून महिलेशी गैरवर्तन सुरू केले असता, आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिचा दिव्यांग मुलगा मदतीसाठी धावून आला. त्याने आरोपीशी निकराने झुंज दिली, मात्र नराधमाने त्याला पाणी भरलेल्या टबमध्ये दाबून त्याचा जीव घेतला. त्यानंतर आरोपीने महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केली आणि मृतदेहावर घोंगडी टाकून पळ काढला.

सीसीटीव्ही फुटेज समोर

सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून या गुन्ह्याचा घटनाक्रम स्पष्ट झाला आहे. सोमवारी संध्याकाळी 7:25 वाजता महिला किराणा आणि दूध घेऊन घरी परतताना दिसली, तर 7:31 वाजता आरोपी तिच्या घराच्या दिशेने जाताना कॅमेऱ्यात कैद झाला. घटनेच्या वेळी महिला आपल्या मेहुण्याशी फोनवर बोलत होती, तेव्हाच आरोपीने दरवाजाला धक्का मारून घरात प्रवेश केला. तपासादरम्यान महिलेच्या बहिणीने पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने तिच्या बहिणीशी गैरवर्तन केले होते आणि त्यातूनच हा प्रकार घडला असावा.

हे ही वाचा : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 18 वर्षानंतर लग्नासाठी आणला दबाव अखेर...

आरोपीचा शोध सुरु

सध्या आरोपी फरार असून त्याने स्वतःचा मोबाईल फोन बंद ठेवला आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी चार पथके तैनात केली असून त्याच्या नातेवाईकांचीही चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून 'आम आदमी पार्टी'च्या प्रतिनिधींनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. पीडितेच्या अंगावर जखमांच्या खुणा आणि फाटलेले कपडे नराधमाच्या क्रूरतेची साक्ष देत असून, पोलीस लवकरच त्याला बेड्या ठोकतील असा विश्वास एसीपी विकास कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे.
 

    follow whatsapp