Crime News : एका आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सहा महिने सलग अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला असून, आरोपीने भीती दाखवून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड : घरातलं काम करत नाही म्हणून आई-वडिल रागावले, एकुलत्या एक मुलाने केली आत्महत्या
जबरदस्तीने केले अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची तिच्याच शेजारी राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींशी मैत्री झाली होती. या बहिणी तिला वारंवार आपल्या घरी बोलावून घेत असत. याच दरम्यान त्यांनी आपला भाऊ साहिल याच्याशी पीडितेची ओळख करून दिली आणि त्यांच्यात संवाद वाढवला. एके दिवशी या दोघी बहिणींनी पीडितेला घरी बोलावून तिला खोलीत एकटे सोडून बाहेरून कडी लावून घेतली. याच संधीचा फायदा घेत साहिलने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले आणि कोणाला सांगितल्यास बदनाम करण्याची धमकी दिली.
गर्भवती राहिल्यानंतर प्रकार समोर
या धमकीला घाबरून पीडितेने कोणालाही काही सांगितले नाही, ज्याचा फायदा घेत आरोपी साहिल गेल्या सहा महिन्यांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. दरम्यान, मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले असता, ती गर्भवती असल्याचे समजताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता, पीडितेने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडितेच्या पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपी साहिल आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या दोन बहिणींविरुद्ध तक्रार दाखल केली.
हे ही वाचा : वहिणी 'नाही' म्हटल्याने सलून चालकाने केले कांड, वहिणीसह चिमुकल्या पुतणींवर फेकले ॲसिड; पोलिसांनाही दिला गुंगारा
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची धाव
या घटनेची माहिती मिळताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेत पीडितेच्या कुटुंबाला पाठिंबा दिला. दलित समाजातील मुलींना लक्ष्य करून अशा प्रकारे फसवणुकीच्या घटना घडत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रौन पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, फरार झालेल्या मुख्य आरोपी साहिलच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT











