तुम्ही अनिल अग्रवाल यांचे व्हिडिओ पाहिले असतील. ते सांगतात की, ते कधी काळी पाटण्यात भंगार विकायचे, वयाच्या 19 व्या वर्षी ते पाटण्याहून मुंबईत सुटकेस घेऊन आले होते. आता ते लंडनमध्ये राहतात. त्यांच्याकडे सुमारे 35 हजार कोटींची मालमत्ता आहे. ते वेदांता रिसोर्सेस लिमिटेड (VRL) चे अध्यक्ष आहेत. हा स्वप्नासारखा प्रवास आहे. आता अमेरिकन संशोधन कंपनी व्हायसरायने (Viceroy) VRL वर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, ही कंपनी भारतीय बाजारात सूचीबद्ध वेदांता लिमिटेड (VEDL) ची 'पॅरासाइट' आहे. ती डिव्हीडंड आणि ब्रँड फी घेऊन चालत आहे. ती 'दिवाळखोरीच्या स्थितीत' आहे. वेदांताने हे स्पष्टपणे नाकारले आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण पैसा-पाणी या सदरातून समजून घेऊ?
ADVERTISEMENT
वेदांतावर कोणी केले आरोप?
तुम्हाला हिंडेनबर्ग आठवत असेल. अदानी ग्रुपवरील अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वी, त्यांनी शेअर्समध्ये एक शॉर्ट पोझिशन घेतली होती, म्हणजेच शेअर्सच्या किंमती घसरल्याने त्यांना फायदा झाला. त्याचप्रमाणे, व्हायसरायने VRL च्या कर्जावर म्हणजेच बाँड्सवर एक शॉर्ट पोझिशन घेतली आहे. त्यांना वाटते की, त्यांच्या रिपोर्टनंतर VRL चे गुपित उघड होईल. सुमारे 40 हजार कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यात त्यांना अडचणी येतील. त्यामुळे बाँडची किंमत कमी होईल. व्हायसरायला फायदा होईल.
VRL चा स्वतःचा कोणताही व्यवसाय नसल्याचा दावा व्हायसरायने केला आहे. ते वेदांता ग्रुपच्या कंपन्यांकडून डिव्हीडंड, ब्रँड फी आणि कर्ज घेऊन कर्ज फेडतं. वेदांता लिमिटेड व्यतिरिक्त, वेदांता ग्रुपमध्ये हिंदुस्तान झिंक, बाल्को (Balco), केर्न्स एनर्जी (Cairns energy) सारख्या कंपन्या आहेत. हा ग्रुप प्रामुख्याने धातूंचा व्यवहार करतो. तांबे, अॅल्युमिनियम, झिंक सारख्या क्षेत्रात.
याशिवाय, ते ऑइल गॅसचाही व्यवहार करतात. हिंदुस्तान झिंक आणि बाल्को हे अनिल अग्रवाल यांनी भारत सरकारकडून विकत घेतले होते. सरकारचे अजूनही त्यात शेअर्स आहेत आणि खरं तर हिंदुस्तान झिंक हा ग्रुपचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. कारण ग्रुपच्या कमाईमधील जवळजवळ अर्धा भाग हा हिंदुस्तान झिंक कंपनीतून येतो.
आरोपांमुळे कोणाचा होणार फायदा?
व्हायसरायचा आरोप आहे की, VEDL ने गेल्या तीन वर्षांत डिव्हीडंडद्वारे VRL ला सुमारे 42 हजार कोटी रुपये दिले आहेत. जरनफ्यातून डिव्हीडंड दिला जात असता तर कोणतीही अडचण आली नसती. पण डिव्हीडंड देण्यासाठी VEDL ने कर्ज घेतले. गेल्या तीन वर्षांत त्यांचे कर्ज 200% वाढले आहे. त्याचप्रमाणे, VRL त्यांच्या कंपन्यांकडून वेदांता ब्रँड वापरण्यासाठी ब्रँड फी घेते.
व्हायसरायचं म्हणणं आहे की, हिंदुस्तान झिंक सारख्या कंपन्या ब्रँड वापरत नाहीत. तरीही ते फी देतात. त्यांचा दावा आहे की, जर हे पैसे मिळाले नाहीत तर VRL दिवाळखोरीत निघेल. ते कर्ज फेडू शकणारच नाहीत.
व्हायसरायच्या, अहवालानंतर वेदांता ग्रुपचे शेअर्स पडले, पण नंतर त्यात रिकव्हरी झाली. त्याचप्रमाणे VRL चे बाँडही पडले, मात्र त्यातही आता रिकव्हरी झाली आहे. लक्षात ठेवा की, VRL च्या बाँडच्या किंमती घसरण्यातच व्हायसरायचा फायदा आहे. अहवाल आल्यानंतर, वेदांता ग्रुपने म्हटले की, हा अहवाल चुकीचा आहे. यात काही नवीन नाही. कंपनीने आधीच शेअर बाजाराला सर्वस्व दिले आहे. आता अनिल अग्रवाल या आव्हानाला कसे सामोरे जातात हे पाहायचे आहे. त्यांच्यासाठी वाद नवीन नाहीत पण यावेळी आरोप मोठा आहे.
ADVERTISEMENT
