crime news : दोन भावांनी विवाहित महिलेचं तोंड बांधून पतीसमोर लैंगिक शोषण केलं. आरोपी दोन्ही भाऊ आणि पीडित महिला हे एकाच गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. महिलेवर तिच्या पतीसमोरच लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर पीडितेनं घडलेला एकूण प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, चौकीदाराने तिला धमकी दिली की, जर तिने गुन्हा दाखल केला तर तो तिच्या तीन वर्षांच्या मुलाला मारून टाकेल. ही घटना बिहारमधील बिरौली पोलीस ठाण्यात घडली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लडकी का चक्कार बाबू भैय्या! तरुणाकडून दिवसाढवळ्या गोळीबार, हादरून टाकणारं प्रेमप्रकरण
पतीसमोर महिलेचं लैंगिक शोषण
पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआरआयमध्ये पीडितेनं म्हटलं की, गावातील चौकीदाराची दोन मुलं जमाल नदाफ आणि सत्तार नदाफ सोमवारी रात्री सोमवारी 1 वाजता महिलेच्या खोलीत घुसले. त्यानंतर सत्तारने तिच्या पतीसमोर टॉवेलनं महिलेचा गळा दाबत लैंगिक शोषण केलं.
वडिलांकडून मुलांची पाठराखण
पीडितेच्या पतीनं या घटनेदरम्यान हस्तक्षेप केला असता, तिला मारहाण करण्यात आली. पतीने तात्काळपणे घटनेची माहिती आरोपीचे वडील जलील नदाफ यांना दिली होती. यानंतर वडिलांनी आपल्या मुलांची पाठराखण करत त्यांना दूर पळून जाण्यास सांगितले. दरम्यान, तेव्हाच काही ग्रामस्थांनी चौकीदारचा मुलगा सत्तारला पकरडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.
हे ही वाचा : पुण्यात भररस्त्यातच तरुणाकडून लघुशंका, महिलेनं केला हस्तक्षेप, तरुणांची सटकली नंतर...
पीडितेनं पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, चौकीदार जलील नदाफने धमकी दिली होती की, जर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यास तुझ्या तीन वर्षाच्या मुलाचा खून करेन. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. बिरौलचे एसएचओ विशाल कुमार सिंह म्हणाले की, पीडितेनं केलेल्या अर्जावर एफआरआय दाखल करण्यात आला आहे. त्यांना घटनेचा व्हिडिओ देखील मिळाला आहे, या घटनेती एक आरोपी सत्तार याला अटक करण्यात आली आहे. तसेच दुसरा आरोपी जमाल याला पोलिसांनी अटक करण्यासाठी शोध घेतला.
ADVERTISEMENT
