Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. पुण्यातून कधी चोरीचं प्रकरण समोर येतं, तर कधी कोयता गँगच्या दहशतीच्या बातम्या समोर येत आहेत. याच पुण्यातील वडारवाडीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडारवाडीच्या कमानीलगतच्या रस्त्यावर काही टवाळ तरुण लघुशंका करत होते. त्यांना काही महिलांना विरोध केला असता, त्यांनी गाड्यांची तोडफोड केल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लडकी का चक्कार बाबू भैय्या! तरुणाकडून दिवसाढवळ्या गोळीबार, हादरून टाकणारं प्रेमप्रकरण
संबंधित प्रकरणात चतु:श्रृंगी पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींची नावेही आता समोर आली आहेत. विशाल पवार ( वय 22) अभिषेक माने (वय 24), अशुतोष लाटे (वय 28) आणि शंकर विटकर ( वय40) हे सर्व वडारवाडीतील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.
तरुण लघुशंका करत होता अन् महिलेनं विरोध करताच...
संबंधित प्रकरणात महेश पवार नावाच्या तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास विशाल पवार हा रस्त्यावर वडारवाडी कमानीजवळ लघुशंका करत होता. तेव्हाच तक्रारदार मुलाच्या आईने त्याला अशा कृत्याबाबत जाब विचारला. याच रागातून विशालने आणि त्याच्या साथीदारंनी तक्राराने पार्क केलेल्या वाहनांपैकी स्कोडा कार, दोन स्कूटी दुचाक्यांची तोडफोड केली होती.
महिलेच्या मुलाकडून पोलीस ठाण्यात तक्रार
संबंधित घटनेची माहिती मिळताच महेश पवार घटनास्थळी दाखल जाले आणि त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा अभिषेक माने, आशुतोष लाटे, शंकर विटकर हे तिघेही घटनास्थळी आले. तेव्हा त्यांनी महेश पवार आणि त्याच्या भावाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तेव्हा भांडण सोडवण्यासाठी आलेल्या एका गणेश एकबोटेलाही बेदम मारहाण केली.
हे ही वाचा : 'तू काळी आहेस, माझ्या लायक नाहीस...' नवऱ्यानं आणून दिली क्रिम, नंतर बायकोलाच जाळलं... भयंकर कांड समोर आलं
या दोघांच्या भांडणात महेश पवारची सोन्याची अंगठी आणि सोन्याची चैन, तसेच त्याच्या भावाची चैन गहाळ झाली. संबंधित प्रकरणात तपास पोलीस निरीक्षक दादाराजे पवार करत आहेत.
ADVERTISEMENT
