Nagpur Crime News : नागपुरात पत्नीने पतीसोबत मिळून प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. पुण्यावरून होळी साजरी करण्यासाठी गावी आलेल्या तरुणाचा भरदिवसा खून करण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपी पती-पत्नी करण्यात आली असून नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात गुरुवारी भरदिवसा घडलेल्या हत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
काटा काढण्यासाठी इन्स्टाग्रामवर मेसेज करुन बोलावलं
अधिकची माहिती अशी की, खापरखेडा-कोराडी रोडवर एका पती-पत्नीने मिळून एका तरुणावर धारदार चाकूने अनेक वार करत त्याची हत्या केली. तपासात मृत तरुण आणि आरोपी महिलेचे प्रेमसंबंध असल्याची बाब समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव सागर वानखेडे आहे. तो पुण्यात नोकरी करत होता. होळी साजरी करण्यासाठी तो पुण्यावरून नागपुरात आपल्या गावी आला होता. या प्रकरणात पोलिसांनी राजू गजभिये आणि त्याची पत्नी सोनाली गजभिये या दोघांना अटक केली आहे.
हेही वाचा : पुणे : शाळेत टिळा लावून येण्यास मनाई, मुख्याध्यापकावर खळबळजनक आरोप; हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते आक्रमक
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली आणि सागर यांच्यात शिक्षण घेत असतानापासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर सोनालीचे लग्न राजू गजभिये याच्यासोबत झाले आणि त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र लग्नानंतरही सोनाली आणि सागर यांच्यात संपर्क कायम होता. या प्रकरणाबाबत यापूर्वीही राजू गजभिये यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पर्स खाली पाडून प्रियकाराव महिलेने केला वार
दरम्यान, होळी साजरी करण्यासाठी सागर पुण्यावरून आपल्या सावंगी गावात आला होता. त्याचवेळी त्याने इन्स्टाग्रामवरून सोनालीला मेसेज करून भेटण्यासाठी बोलावले. गुरुवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास सागर खापरखेड्यात आला. श्याम मंगल कार्यालयाजवळ सोनाली त्याच्या बाईकवर बसून दोघे निघाले. यावेळी सोनाली आपल्या सोबत चाकू घेऊन आली होती. दरम्यान, राजू गजभिये यांनी मुलांना शाळेत सोडल्यानंतर दोघांचा पाठलाग सुरू केला. खापरखेडा-कोराडी रोडवरील कोलार नदीचा पूल पार केल्यानंतर सोनालीने मुद्दाम आपली पर्स खाली पाडली. सागर बाईक थांबवून पर्स उचलण्यासाठी खाली उतरला, तेवढ्यात सोनालीने चाकू काढून त्याच्यावर दोन वार केले. त्याचवेळी तेथे पोहोचलेल्या राजू गजभिये यांनीही सागरवर अनेक वार केले. या हल्ल्यात सागरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर आरोपी पती-पत्नी घरी परतले. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी जात असताना पोलिसांच्या डीबी पथकाने त्यांना रस्त्यातच ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही हत्या केल्याची कबुली दिली आहे. घटनेनंतर सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी कोराडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खापरखेडा आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











