Maharashtra Weather : राज्यात एप्रिल महिन्यात दुहेरी हवामानाची परिस्थिती होती. अशातच 1 मे 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर आणि वर्ध्यात उष्णतेचं सावट असून यलो अलर्ट जारी करण्यात आलाय, अशातच तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, जाणून घ्या राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भाजप नेत्याचं कांड, लग्नाचं आमिष दाखवून तरुणीचं वारंवार लैंगिक शोषण, कुटुंबीयांनी देखील.. लाज आणणारी घटना
कोकण
कोकण विभागात हवामान मुख्यत्वे कोरडं राहील अशी शक्यता आहे, तसेच कोकण किनारपट्टीलगत हवामान दमट राहील. दुपारी घराबाहेर पडताना उन्हापासून काळजी घ्यावी, असा हवामानाच इशारा आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा कायम राहणार असून तापमान कायम राहणार आहे, अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली नाही. उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपारी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.
मराठवाडा
मराठवाडा विभागात उष्णतेचा अधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : 'आई दादासोबत खिडकी बंद करून..', आईचे-मुलाशी अनैतिक संबंध असल्याचा बापाला संशय; पोराचा झोपेत...
विदर्भ
विदर्भाच्या अमरावती विभागात उष्णतेचा जोर अधिक आहे, तसेच काही भागांमध्ये उष्णतेत अधिक वाढ जाणवेल. नागपूर विभागात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. वर्धा आणि आसपासच्या भागातही उन्हाचा चटका अधिक जाणवणार आहे.
ADVERTISEMENT











