कधी आपण जुने बँक खाते बंद करायचं विसरतो, एखादी जुनी Mutual Fund गुंतवणूक लक्षात राहत नाही, नोकरी बदलल्यानंतर PFचा मागोवा राहत नाही किंवा वर्षानुवर्षे एखाद्या Insurance Policyचा विसर पडतो. विशेष म्हणजे, तुमच्या नावावर असलेली प्रत्येक आर्थिक गुंतवणूक एका ठिकाणी दिसेलच असं नाही. त्यामुळे वर्षातून किमान एकदा स्वतःच्या नावावर असलेल्या आर्थिक मालमत्तेचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT
यासाठी वेगवेगळ्या सरकारी आणि अधिकृत प्लॅटफॉर्मचा वापर करून एका दिवसात तुमची ‘Financial Inventory’ तयार करता येऊ शकते.
1. सर्वप्रथम बँक खात्यांमध्ये पैसे आहेत का ते तपासा
यासाठी RBIचं UDGAM (Unclaimed Deposits – Gateway to Access Information) पोर्टल महत्त्वाचं आहे. या प्लॅटफॉर्मवर सहभागी बँकांमधील Unclaimed Deposits/Accounts शोधता येतात. व्यक्तीच्या बाबतीत नाव, बँक आणि PAN, Driving Licence, Voter ID, Passport किंवा Date of Birth यापैकी आवश्यक माहिती वापरून शोध घेता येतो.
UDGAMवर सगळ्या बँकांचे खाते किंवा प्रत्येक प्रकारची Deposit दिसेलच असं नाही. त्यामुळे तुमच्या जुन्या Bank Statements, Email आणि SMSमध्येही शोध घ्या.
2. तुमच्या नावावर किती Mutual Funds आहेत?
अनेकांनी वर्षांपूर्वी केलेली Mutual Fund गुंतवणूक विसरलेली असू शकते. विशेषतः जुने Folio, बदललेला Email किंवा Mobile Number असल्यास गुंतवणुकीचा मागोवा घेणं कठीण होऊ शकतं.
यासाठी MITRA (Mutual Fund Investment Tracing and Retrieval Assistant) उपयोगी ठरू शकतं. SEBIने inactive आणि unclaimed Mutual Fund folios शोधण्यासाठी हे प्लॅटफॉर्म सुरू केलं आहे.
MITRAच्या माध्यमातून विसरलेल्या किंवा inactive Mutual Fund investments शोधण्यास मदत होते. मात्र एखादी गुंतवणूक सापडली म्हणजे पैसे लगेच मिळतील असं नाही; पुढील प्रक्रिया संबंधित AMCकडे करावी लागू शकते.
याशिवाय MFCentral/CAMS/KFintechच्या माध्यमातून Consolidated Account Statement म्हणजेच CAS मिळवता येतो. त्यातून वेगवेगळ्या Mutual Fund कंपन्यांमधील तुमची holdings एकत्र पाहता येतात.
3. तुमच्या नावावर Shares आणि Demat Accounts आहेत का?
पूर्वी Share Marketमध्ये गुंतवणूक केलेली असेल आणि आता Broker बदलला असेल, तरी जुने Demat Account किंवा Holdings राहू शकतात.
CDSLच्या easi सुविधेत Demat Holdings आणि Transactions पाहता येतात. CDSLनुसार easiच्या माध्यमातून portfolio, holdings, transactions आणि CAS पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- कोणते Shares आहेत?
- किती Demat Accounts आहेत?
- जुने Shares अजूनही पडून आहेत का?
- Corporate Actionsमधून मिळालेल्या Sharesचा मागोवा आहे का?
4. Insurance Policyमध्ये पैसे अडकले आहेत का?
Life Insurance, Health Insurance किंवा इतर Insurance Policy घेतली होती आणि त्यानंतर तिचा विसर पडला असेल, तर ही माहितीही तपासण्यासारखी आहे.
IRDAIच्या Bima Bharosa प्लॅटफॉर्मवर Unclaimed Amount शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. Policyholderचे नाव, Mobile Number, Date of Birth, PAN आणि Insurance Companyशी संबंधित माहिती वापरून Query करता येते.
5. नोकरी बदलली असेल तर PF विसरू नका
नोकरी बदलताना अनेक वेळा जुन्या PF Accountचा तपशील लक्षात राहत नाही. तुमच्या UANच्या माध्यमातून EPFO Member Portal/Passbookवर PF contribution, balance आणि withdrawal details तपासता येतात. EPFOच्या Passbook सुविधेत UANद्वारे Login करून माहिती पाहता येते
एका दिवसात तुमची Financial Inventory कशी तयार करायची?
ADVERTISEMENT












