Personal Finance: 1 जूनपासून बदलणार क्रेडिट कार्डचे नियम, जराही चुकलात तरी माफी नाही!

From 1 June 2025 Major changes in credit card rules: 1 जून 2025 पासून क्रेडिट कार्डबाबत अनेक नियम बदलणार आहेत. जर याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला बरंच नुकसान होऊ शकतं.

Personal Finance

Personal Finance

रोहित गोळे

27 May 2025 (अपडेटेड: 27 May 2025, 01:19 PM)

follow google news

Personal Finance tips for Credit Card: मे महिना संपत असताना, क्रेडिट कार्ड यूजर्ससाठी एक नवीन सुरुवात होणार आहे. 1 जून 2025 पासून अनेक मोठ्या बँका त्यांच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल करणार आहेत. या नवीन नियमांचा तुमच्या खिशावर, रिवॉर्ड्स आणि खर्चावर थेट परिणाम होणार आहे. जर तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे.

हे वाचलं का?

ऑटो-डेबिट फेल झालं तर? आता 2% पर्यंत आकारला जाईल दंड 

जर तुम्ही ऑटो-डेबिट सेट केले असेल आणि ते कोणत्याही कारणास्तव अयशस्वी झाले, तर बँका आता तुमच्याकडून 2% पर्यंत दंड आकारू शकतात. कोटक महिंद्रा बँकेने या बदलाबाबत आधीच माहिती जारी केली आहे. याचा अर्थ असा की, वेळेवर पैसे देणे आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे झाले आहे.

युटिलिटी बिलांवरही आकारले जाईल शुल्क

आता जर तुम्ही वीज, पाणी, गॅस सारखी युटिलिटी बिले निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त भरली तर तुम्हाला प्रत्येक स्टेटमेंट सायकलमध्ये 1% अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. पण काही प्रीमियम आणि निवडक कार्डांना यातून सूट देण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरील खर्च वाढला? 

आता इंधनावरही नवीन शुल्क आकारले जाईल. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून पेट्रोल, डिझेल किंवा इतर इंधनावर एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला तर तुम्हाला 1% अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. तथापि, इंडियन ऑइल कोटक कार्ड आणि काही प्रीमियम कार्ड या नियमाबाहेर असतील.

आंतरराष्ट्रीय ट्रान्झेक्शन आणि DCC शुल्क

जर तुम्ही आंतरराष्ट्रीय पेमेंट केले आणि DCC (Dynamic Currency Conversion) वापरला तर बँक आता तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारेल. शिक्षणाशी संबंधित आंतरराष्ट्रीय देयकांवरही नवीन शुल्क लागू होतील. बँकांच्या वेबसाइटवर तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.

रिवॉर्ड पॉइंट्समध्ये मोठा बदल

1 जूनपासून रिवॉर्ड पॉइंट्समध्ये मोठा बदल होणार आहे. त्याआधी, हे रिवॉर्ड पॉइंट्स आतापर्यंत कसे मिळत होते, ते आपण जाणून घेऊया.

रिवॉर्ड्स पॉइंट्स कसे मिळायचे?

प्रत्येक खर्चावर पॉइंट्स: जेव्हा तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड शॉपिंग, रेस्टॉरंट पेमेंट, ऑनलाइन पेमेंट किंवा इतर खरेदीसाठी वापरता तेव्हा बँक निश्चित दराने रिवॉर्ड पॉइंट्स देते.

  • उदा.: खर्च केलेल्या प्रत्येक ₹100 वर 1-5 पॉइंट्स (कार्ड प्रकारावर अवलंबून).
  • बोनस आणि माइलस्टोन पॉइंट्स: काही कार्ड विशिष्ट प्रमाणात वार्षिक खर्च (उदा. ₹1 लाख) साध्य केल्यावर बोनस पॉइंट्स देतात.
  • विशेष कॅटेगरी पॉइंट्स: प्रवास, फूड डिलिव्हरी, इंधन किंवा ब्रँडेड स्टोअरवर अधिक रिवार्ड्स मिळतात.

रिवॉर्ड्सचा वापर

शॉपिंग व्हाउचर, फ्लाइट तिकिटे, रिचार्ज, उत्पादने किंवा कॅशबॅकसाठी पॉइंट्स रिडीम केले जाऊ शकतात.

1 जून 2025 पासून कोणता मोठा बदल होईल?

अनेक खर्चांवर रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध नसतील. जसे-

  • भाडे देयके
  • वॉलेट टॉप-अप (Paytm, PhonePe)
  • युटिलिटी बिल (वीज, पाणी)
  • विमा
  • सरकारी शुल्क
  • शिक्षण शुल्क
  • टोल आणि वाहतूक

वार्षिक शुल्क माफ करण्याचा देखील परिणाम

आता बँका वार्षिक खर्च मोजताना भाडे आणि वॉलेट ट्रान्झेक्शन व्यवहार जोडणार नाहीत. याचा अर्थ त्यांचे वार्षिक शुल्क माफ केले जाणार नाही.

    follow whatsapp