बाईईई... सोनं पुन्हा महागलं की, आजचे भाव वाचून तुम्हीही याल टेन्शनमध्ये!

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सातत्याने मोठे बदल होत आहेत. मागील काही दिवसात सोनं हे 90 हजार ते 1 लाख रुपये प्रतितोळा एवढ्या दराने विकलं जात आहे. पाहा सोन्याचा आजचा दर किती आहे.

Today Gold Rate: सोनं पुन्हा महागलं

Today Gold Rate: सोनं पुन्हा महागलं

मुंबई तक

• 08:22 PM • 27 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा झाली वाढ

point

सोन्याचे आजचे नेमके दर किती?

point

पुण्यात आज 1 तोळा सोन्याचा भाव किती?

Gold Rate Today: भारतीय सराफा बाजारात आज, 27 मे 2025 रोजी, सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे, ज्यामुळे लग्नसराई आणि गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजार अद्यापही अस्थिर आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपया देखील कमकुवत आहे.  या सगळ्याचा परिणाम हा सोन्याच्या दरावर झाला आहे.

हे वाचलं का?

याशिवाय मागणीतील देखील सातत्याने वाढ होत असल्याने सोन्याचे दर आता पुन्हा एकदा वधारले आहेत. भारतीय हवामान खात्याच्या मते, सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना आणि मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढत असताना, सोन्याच्या किंमतींवर स्थानिक मागणीचा प्रभाव पडू शकतो.

22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत आज 450 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर हा आता 89,950 एवढा झाला आहे. तर याशिवाय 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमच्या दरात 490 रुपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 98,130 रुपये एवढी झाली आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय?

1. मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98,130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89,950 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा>> पैसा-पाणी: रिझर्व्ह बँकेने दिली मोठी आणि आनंदाची बातमी!

2. पुणे

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98,130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89,950 रुपये झाले आहेत.

3. नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98,160 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89,980 रुपये झाले आहेत.

4. जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98,130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89,950 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा>> Personal Finance: 1 जूनपासून बदलणार क्रेडिट कार्डचे नियम, जराही चुकलात तरी माफी नाही!

5. छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98,130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89,950 रुपये झाले आहेत.

6. सोलापूर

सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98,130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89,950 रुपये झाले आहेत.

7. कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98,130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89,950 रुपये झाले आहेत.

8. नागपूर

नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98,130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89,950 रुपये झाले आहेत.

    follow whatsapp