नवी दिल्ली: लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. आपल्याला माहिती आहे की, भारतात लग्नासाठी खूप खर्च येतो. कधीकधी पैशांची व्यवस्था करणे कठीण होते. अचानक नवीन गरज निर्माण झाली की समस्या आणखी बिकट होते. अशा परिस्थितीत, लग्नासाठी आवश्यक असलेल्या पैशांची व्यवस्था कर्ज घेऊन करता येते. अनेक बँका आणि एनबीएफसी लग्नासाठी कर्ज देतात.
ADVERTISEMENT
जर तुम्ही लग्नासाठी कर्ज घेतले तर त्यासाठी वेगळा नियम नाही. बँका किंवा एनबीएफसी लग्नासाठी Personal Loan देतात. क्रेडिट स्कोअर किंवा उत्पन्नानुसार, 50 हजार ते 30 लाख रुपयांचे Personal Loan घेता येते. त्याच वेळी, काही बँका किंवा एनबीएफसी 30 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज देतात.
या 5 गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्ही लग्नासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर 5 गोष्टी अजिबात विसरू नका
1. व्याजदराबद्दल विचारा
Personal Loan हे एक असुरक्षित कर्ज आहे. बँका यावर खूप जास्त व्याज आकारत असतात. हे दरवर्षी 10 ते 15 टक्के असू शकते. अशा परिस्थितीत, EMI भरणे खूप महागडं ठरतं. तुम्ही जिथे कर्जासाठी अर्ज करणार आहात त्यांचा व्याजदर किती आहे हे विचारायला अजिबात विसरू नका. तसंच कमी व्याजदर असलेल्या बँकेकडून किंवा एनबीएफसीकडून कर्ज घेण्यास प्राधान्य द्या.
2. गरजा लक्षात ठेवा
तुम्हाला लग्नासाठी जेवढे कर्ज आवश्यक आहे तेवढ्या कर्जासाठीच अर्ज करा. तुम्हाला कर्ज हे 20 लाख रुपयांपर्यंत देखील मिळू शकतं, पण तुम्हाल गरज केवळ 5 लाख रुपयांची असेल तर फक्त 5 लाखाचेच कर्ज घ्या. जर तुम्ही जास्त रकमेचे कर्ज घेतले तर तुम्हाला अधिक EMI भरावा लागेल. अशा परिस्थितीत कर्ज फेडणे कठीण होईल.
3. उत्पन्नानुसार EMI
हे देखील लक्षात ठेवा की, EMI मुळे तुमचं बजेट हलू शकतं. खरंतर, लग्नानंतर खर्च वाढतो अशा परिस्थितीत, लग्नापूर्वी आपण जितकी बचत करतो तितकी लग्नानंतर करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत, आवश्यक असलेल्या कर्जाच्या रकमेचाही EMI भरणे कठीण आहे. EMI मासिक उत्पन्नाच्या 30% पेक्षा जास्त नसावा.
4. कर्जाची लवकर करा परतफेड
Personal Loan हे फेडणं खूप महाग असतं. पण शक्य असल्यास, वेळेपूर्वी परतफेड करा. यामुळे तुमचं व्याज जास्त जाणार नाही. यासाठी तुम्ही बँकेला काही प्रमाणात पैसे देऊ शकता. जर तुम्हाला ऑफिसकडून बोनस मिळाला किंवा इतर कुठूनही मोठी रक्कम मिळाली तर कर्जाचा काही भाग भरा. यामुळे कर्जाची परतफेड लवकर होण्यास मदत होते.
5. वेळेवर भरा EMI
कर्जाचा EMI वेळच्या वेळी जाईल याची काळजी घ्या. जर तुम्ही कर्ज फेडण्यास उशीर केला तर त्याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होतोच, शिवाय तुमचा क्रेडिट इतिहासही खराब होईल. ज्यानंतर भविष्यात तुम्हाला कर्ज मिळण्यास अडचणी येऊ शकतात. याशिवाय, इतर गोष्टी देखील कर्जावर उपलब्ध नसतील. क्रेडिट कार्ड मिळविण्यातही समस्या येईल.
ADVERTISEMENT
