Mercedeze Accident : नवी मुंबईतील पनवेलमध्ये पुणे पोर्शे घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. न्यू पनवेलच्या परिसरात एका बड्या बापाच्या 19 वर्षीय तरुणीने एका दुचाकीस्वार महिलेला धडक दिली आहे. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं पनवेल हादरून गेलं आहे. ही घटना पनवेल येथील हरिनंदानी येथे बुधवारी रात्री 8 : 45 वाजता घडली आहे. संबंधित प्रकरणात खारघर पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेत अटक केली आहे. दरम्यान, तरुणी ही इंजिनिअरिंगची विद्यार्थीनी होती असे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : लस्सीत गुंगीच्या गोळ्या मिसळून पत्नी बॉयफ्रेंडसोबत छू....बाई काय हा प्रकार?
नेमकं प्रकरण काय?
संबंधित प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये रेखा यादव नावाच्या महिलेचे (वय 50) आहे. त्यांचाच या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. रेखा गुप्ता यांचे पती गोपाल यादव (वय 54) हे अपघातात जबर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गोपाल आणि रेखा हे दोघेही पनवेलच्या देवद भागातील रहिवासी होते.
बुधवारी रात्रीच्या सुमारास रेखा यादव आणि त्यांचे पती गोपाल दोघेही दुचाकीवरून घरी येत होते. त्यावेळी शीव-पनवेल महामार्गावरील खारघर परिसरातील असणाऱ्या हिरानंदानी परिसरातील पुलावरून त्यांची दुचाकी खाली येत होती. त्यावेळी तिथी सिंह नावाच्या बड्या बापाच्या लेकीनं मर्सिडीज कारने भरधाव वेगाने दुचाकीला धडक दिली आणि होत्याचं नव्हतं झालं.
मर्सिडीझने दिलेल्या धडकेत दोघेही हवेत फेकले गेले आणि आदळले. रेखा यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आणि अशातच त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गोपाळ यांच्या हातापायाला, चेहऱ्याला गंभीर इजा झाल्याचे दिसून आले. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मात्र, डॉक्टरांनी रेखा यांना मृत घोषित केलं.
हेही वाचा : हसावं की रडावं? पत्नी बॉयफ्रेंडला भेटायला गेल्यानं पतीनं चावलं पत्नीचं नाक अन्....
संबंधित प्रकरणात तिथी सिंह तरुणी आपल्या मित्रांना भेटून परतत होती. त्यावेळी ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. तिथीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिला ताब्यातही घेण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
