भिवंडी हादरली! नवऱ्यानं बायकोचा गळा चिरून खाडीत फेकलं मुंडकं, नंतर शरीराचे केले तुकडे, घटना ऐकून पोलिसंही चक्रावले

Bhiwandi Crime : भिवंडीत एक मन सुन्न करून टाकणारं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ईदगाह रोड परिसरात झोपडपट्टीतील कत्तलखान्याजवळील नाल्यात एका महिलेचं छाटलेलं मुंडकं आढळलं आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.

bhiwandi crime

bhiwandi crime

मुंबई तक

04 Sep 2025 (अपडेटेड: 04 Sep 2025, 05:22 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भिवंडीत मन सुन्न करून टाकणारं धक्कादायक प्रकरण

point

परिसरात भीतीचं वातावरण

point

हादरून टाकणारी घटना

Bhiwandi Crime : भिवंडीत एक मन सुन्न करून टाकणारं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ईदगाह रोड परिसरात झोपडपट्टीतील कत्तलखान्याजवळील नाल्यात एका महिलेचं छाटलेलं मुंडकं आढळलं आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता. ही घटना 30 ऑगस्ट रोजी सकाळी घडली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'ये बाबा येना...' एकनाथ शिंदे आजतकशी साधत होते संवाद, नातवाची अचानक एंट्री, व्हिडिओ तुफान व्हायरल

हत्या करण्यात आलेल्या महिलेचं परवीन उर्फ मुस्कान (वय 22) असे नाव आहे. तर तिची हत्या केलेल्या आरोपी पतीची मोहम्मद तहा अंसारी उर्फ सोनू (वय 25) अशी ओळख समोर आली. तो पेशानं ड्रायव्हर असून दोघांनाही दोन वर्षांपूर्वी विवाह केला होता. त्या दोघांनाही एक वर्षाचं बाळ आहे.

पत्नीचा गळा चिरून निर्घृणपणे हत्या

चौकशीदरम्यान, आरोपी पतीने पत्नीचा गळा चिरून निर्घृणपे हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून खाडीत फेकून दिल्याची कबुली दिली. आरोपीने असं कृत्य करण्यामागचं खरं कारण अद्यापही समोर आलं नाही. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत. भोईवाडा पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

शोधमोहिमेसाठी श्वान पथक 

11 सप्टेंबर रोजी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. जिथं महिलेचा मृतदेह आढळला त्या ठिकाणी श्वान पथक शरीराचा उरलेल्या भागाचा शोध घेत आहे. या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितलं की, हत्येनंतर आरोपींना पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा अद्यापही तपास सुरुच आहे. मृतदेहाचे उरलेले भाग शोधण्याचे काम सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : वय सरत चाललंय लग्न होत नाही म्हणून...लेकाचा संपात अन् आईचीच केली हत्या, थरकाप उडवणारी घटना समोर

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपास 

त्यानंतर या प्रकरणाचा शोध घेत असताना, पोलिसांनी घटनास्थळी असलेले संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे तपासून घेतले. त्यानंतर ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या परिसरात राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली असता, मुस्कानचे घर गेली काही दिवस बंद असल्याचं सांगण्यात आलं.

    follow whatsapp