लग्नाच्या 25 दिवसानंतर दुसरी नवरी घरी आणली..पहिली पत्नी पोलिसांना म्हणाली, पतीच्या 2 मागण्या पूर्ण केल्या नाही, म्हणून..

Couple Shocking Viral News : हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी अनेक महिलांचा छळ केल्याचं अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलंय. काही ठिकाणी विवाहित महिलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

Groom And Bride Shocking Viral News

Groom And Bride Shocking Viral News

मुंबई तक

• 03:38 PM • 04 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीकडे एक लाख रूपये आणि बाईकची मागणी केली अन्...

point

शेजारच्या गावात राहणाऱ्या तरुणीशी होतं अफेअर

point

त्या गावात नेमकं काय घडलं?

Couple Shocking Viral News : हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी अनेक महिलांचा छळ केल्याचं अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलंय. काही ठिकाणी विवाहित महिलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसच काही महिलांची हत्याही करण्यात आलीय. अशाच प्रकारची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या गोंडा येथे घडली. लग्नाच्या 25  दिवासानंतर नवऱ्याने दुसऱ्या नवरीसोबत लग्न केलं.

हे वाचलं का?

नवऱ्याने लग्नानंतर नवरीकडे 1 लाख रुपयांचा हुंडा आणि बाईकची मागणी केली होती, असा आरोप आहे. यामुळेच विवाहितेचा छळ केला जात होता. विवाहित महिलेनं म्हटलं, जेव्हा मी पतीला दुसऱ्या लग्नाबाबत विरोध केला, तेव्हा मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पीडित महिलेनं आता पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे. माझे वडील गरिब आहेत. ते एवढा हुंडा देऊ शकत नाहीत. मला न्याय द्या, असं त्या महिलेनं पोलीस अधिक्षकांना सांगितलं. 

पत्नीकडे एक लाख रूपये आणि बाईकची मागणी केली अन्...

पीडित महिलेनं पोलिसांना सांगितलं, 2 जूनला तिचं लग्न खजुरी गावात राहणाऱ्या रंजीत तिवारीसोबत झालं होतं. वडिलांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार, सासरच्या लोकांना सर्वकाही दिलं होतं. लग्नही चांगल्या प्रकारे पार पडलं. पण मी जेव्हा सासरी पोहचले, माझ्याकडे अतिरिक्त एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तसच त्यांनी माझ्याकडे बाईकचीही मागणी केली. आधी हे सर्व घरून घेऊन ये, असा तगादा त्यांनी लावला. या सर्व मागण्या पूर्ण केल्यानंतरच आम्ही तुला स्वीकारू, असं म्हणाले. मी पतीला आणि सासरच्यांना घरच्या परिस्थितीबाबत सांगितलं होतं, तरीही त्यांना माझा छळ केला. 

हे ही वाचा >> Govt Job: 10 वी पास तरुणांसाठी गुप्तचर विभागात नोकरीची संधी... 'या' पदांसाठी आत्ताच करा अप्लाय!

शेजारच्या गावात राहणाऱ्या तरुणीशी होतं अफेअर

मी सर्वकाही सहन केलं. पण मला माहित झालं की, माझ्या पतीचं शेजारच्य गावात राहणाऱ्या दिव्यांशीसोबत अफेअर होतं. त्यानंतर पतीने तिला 27 जून 2025रोजी पळवून नेलं आणि गुपचूप लग्न केलं. मी याचा विरोध केला, तेव्हा सासरच्या लोकांना मला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेनं आरोप केला आहे की, तिला सासरच्यांनी खूप दिवस बंदी करून ठेवलं होतं. त्यानंतर तिनं कसंतरी माहेरच्यांना याबाबत सांगितलं. 31 ऑगस्ट रोजी कुटुंबियांनी तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि तक्रार दाखल केली. परंतु, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

हे ही वाचा >> "लग्न करेन तर दाजींसोबतच..." मेहुणीने धरला हट्ट, नंतर मोठ्या बहिणीच्या निर्णयाने सर्वांनाच बसला धक्का

    follow whatsapp