"लग्न करेन तर दाजींसोबतच..." मेहुणीने धरला हट्ट, नंतर मोठ्या बहिणीच्या निर्णयाने सर्वांनाच बसला धक्का
एके दिवशी, मेहुणी तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी गेली आणि तिने दाजींसोबतच लग्न करण्याचा हट्ट धरला. मात्र, या सगळ्यावर तरुणीच्या मोठ्या बहिणीने घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दाजींसोबत लग्न करण्याचा मेहुणीने धरला हट्ट

नंतर मोठ्या बहिणीच्या निर्णयाने सर्वांनाच बसला धक्का
Extra Marital Affair: उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये नातेसंबंधाला लाज आणणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका व्यावसायिकाने त्याच्या मुलीचं काशीपुरमध्ये राहणाऱ्या तरुणासोबत लग्न लावून दिलं होतं. मात्र, लग्न झाल्यानंतर वर्षभरातच मेहुणी आणि दाजीचे प्रेमसंबंध सुरू झाले.
त्यानंतर, दोघे सुद्धा एकमेकांसोबत राहण्याचा हट्ट धरू लागले. इतकेच नव्हे तर, मेहुणी तिच्या दाजींच्या घरी पोहोचली आणि म्हणाली की "लग्न करेन तर दाजींसोबतच नाहीतर मी तशीच राहीन." कुटुंबियांनी हे सगळं ऐकल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. घरच्यांनी त्यांच्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला पण, तिने अजिबात ऐकलं नाही. मात्र, या सगळ्यावर तरुणीच्या मोठ्या बहिणीने घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.
मोठ्या बहिणीने धाकट्या बहिणीला आपली सवत म्हणून स्वीकारण्यास सहमती दर्शविली. दाजी आणि मेहुणी तिच्या निर्णयावर खूश होते. पण कुटुंबीय अजूनही या नात्याच्या विरोधात आहेत.
हे ही वाचा: 60 वर्षांच्या वृद्धाने 15 वर्षांच्या मुलीसोबत केलं लग्न! नंतर, नवरा असल्याचा हक्क गाजवत जंगलात नेलं अन्...
मेहुणी आणि दाजीचे प्रेमसंबंध
हे प्रकरण अमरोहा नगर कोतवाली परिसरातील आहे. दोन वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाच्या मोठ्या मुलीचं लग्न काशीपूर येथील एका तरुणासोबत झालं होतं. परंतु, लग्नानंतर पती आणि पत्नीच्या आनंदी आयुष्यात मेहुणीची एन्ट्री झाली. दाजी आणि मेहुणीचे प्रेमसंबंध सुरू झाले आणि घरातील कोणत्याच व्यक्तीला याची कल्पना सुद्धा नव्हती. दोघे लपुनछपून एकमेकांना भेटायचे.
एके दिवशी, मेहुणी तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी गेली आणि तिने दाजींसोबतच लग्न करण्याचा हट्ट धरला. यावर दाजीसुद्धा म्हणाला की "मी माझ्या मेहुणीवर प्रेम करतो आणि मला तिच्यासोबत राहायचं आहे." त्यानंतर, दोन्ही कुटुंबातील सदस्यांपर्यंत ही बाब पोहोचली.
हे ही वाचा: तरुणी झोपली असताना अचानक पीजीमध्ये घुसला अन् खोलीला आतून कुलूप लावलं, नंतर तरुणीसोबत... नेमकं काय घडलं?
लहान बहिणीला सवत म्हणून स्वीकारलं...
मेहुणीच्या कुटुंबातील लोक तिथे पोहोचले आणि त्यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. यानंतर, मेहुणीच्या मोठ्या बहिणीने एक असा निर्णय दिला की कोणीही त्यावर विश्वास ठेवू शकत नव्हती. ती म्हणाली की "मी माझ्या बहिणीला माझी सवत म्हणून ठेवण्यास तयार आहे." हे ऐकून दाजी आणि मेहुणी दोघांनाही आनंद झाला. या प्रेमप्रकरणाची चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतंय.