Govt Job: 10 वी पास तरुणांसाठी गुप्तचर विभागात नोकरीची संधी... 'या' पदांसाठी आत्ताच करा अप्लाय!
इंटेलिजेन्स ब्यूरोकडून सिक्योरिटी असिस्टेंट मोटर ट्रान्सपोर्ट या पदांच्या 450 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारताच्या गुप्तचर विभागाकडून निघाली मोठी भरती...

'या' पदांसाठी आत्ताच करा अप्लाय!
IB Recruitment 2025: भारतीय गुप्तचर विभागाने 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक नवीन भरती जाहीर केली आहे. इंटेलिजेन्स ब्यूरोकडून सिक्योरिटी असिस्टेंट मोटर ट्रान्सपोर्ट या पदांच्या 450 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 6 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 28 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
काय आहे पात्रता?
इंटेलिजेन्स ब्यूरोची ही नवी भरती ग्रुप C लेव्हलच्या पदांसाठी केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. यासोबत यासोबतच, उमेदवारांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स (LMV) आणि मोटर मेकॅनिक्सचे ज्ञान असणं आवश्यक आहे. अर्जासाठी उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करत आहेत त्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र देखील आवश्यक असेल.
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. उमेदवारांच्या वयाची गणना 28 सप्टेंबर 2025 या तारखेच्या आधारे केली जाणार आहे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील म्हणजेच एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: "लग्न करेन तर दाजींसोबतच..." मेहुणीने धरला हट्ट, नंतर मोठ्या बहिणीच्या निर्णयाने सर्वांनाच बसला धक्का
किती मिळेल पगार?
सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी भारताच्या गुप्तचर विभागात नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. सिक्योरिटी असिस्टेंट मोटर ट्रान्सपोर्ट पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांना दर महिन्याला 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत पगार मिळेल. यासोबतच, सरकारी भत्ते आणि सुविधांचा समावेश केला जाईल.
अर्जाचे शुल्क किती?
इंटेलिजेंस ब्युरोच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, सर्व उमेदवारांना 550 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. याव्यतिरिक्त, पुरुष, सामान्य प्रवर्ग, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अतिरिक्त परीक्षा शुल्क भरावे लागेल.
हे ही वाचा: 60 वर्षांच्या वृद्धाने 15 वर्षांच्या मुलीसोबत केलं लग्न! नंतर, नवरा असल्याचा हक्क गाजवत जंगलात नेलं अन्...
कसा कराल अर्ज?
- या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम www.mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- आता होमपेजवरील IB Security Assistant Motor Transport Recruitment 2025 या लिंकवर क्लिक करा.
- अॅप्लिकेशन डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, प्रवर्ग, पत्ता यांसारखी महत्त्वाची माहिती स्टेप बाय स्टेप भरा.
- त्यानंतर, आवश्यक डॉक्यूमेंट्स देखील अपलोड करा.
- शेवटी आपल्या प्रवर्गानुसार, अर्ज शुल्क भरा आणि फॉर्मची प्रिंट काढून घ्या.