मुंबईची खबर: BMC 'या' ठिकाणी उभारणार 166 कोटींचं पक्षी उद्यान, 206 प्रजातींच्या पक्ष्यांचा किलबिलाट अन्...

मुंबई महापालिकेतर्फे मुलुंड येथे लवकरच पक्षीगृह उभारण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. यासाठी तब्बल 166 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

MC 'या' ठिकाणी उभारणार 166 कोटींचं पक्षी उद्यान...

MC 'या' ठिकाणी उभारणार 166 कोटींचं पक्षी उद्यान...

मुंबई तक

• 10:00 AM • 01 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

BMC 'या' ठिकाणी उभारणार 166 कोटींचं पक्षी उद्यान

point

206 प्रजातींच्या पक्ष्यांचा किलबिलाट होणार..

Mumbai News: मुंबईकरांना तसेच मुंबईत फिरायला येणाऱ्या पर्यटकांना विविध दुर्मीळ प्रजातीचे पक्षी पाहता यावेत, यासाठी मुंबई महापालिकेतर्फे मुलुंड येथे लवकरच पक्षीगृह उभारण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. यासाठी तब्बल 166 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून महानगरपालिका प्रशासनाने निविदा प्रक्रियेला सुरूवात केली आहे. याठिकाणी 18 दुर्मीळ प्रजातींसह 206 विविध प्रजातींचे पक्षी पर्यटकांना पाहता येणार आहेत. 

हे वाचलं का?

प्रशस्त आणि नैसर्गिक निवारे

मुलुंड पश्चिम येथील नाहूर गावातील परिसरात हे उद्यान तयार करण्यात येणार आहे. सर्व सुविधांनीयुक्त असलेल्या या उद्यानात प्रशस्त आणि नैसर्गिक निवारे असतील. म्हणजेच पक्षांसाठी नैसर्गित अधिवास तयार करण्यात येणार आहेत. पक्षीगृहात प्रवेश करण्यापूर्वी मोठ्या धबधब्यासह आणि प्रवाहासह पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी खुले प्लाझा देखील असणार आहेत. 

हे ही वाचा: फेसबुकवर झाली मैत्री, नंतर व्हिडीओ कॉलवर अश्लील चाळे... नंतर महिलेसोबत केलं नको ते! बुलढाण्यात खळबळ..

'या' प्रजातींचे पक्षी...

हे प्रस्तावित पक्षी उद्यान 17,958 चौरस मी भूखंडावर बांधण्यात येणार आहे. हे उद्यान भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचे उपकेंद्र असणार आहे. तसेच, या उद्यानाचं काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षे लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या पक्षी उद्यानात आशियाई, आफ्रिकी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी पक्ष्यांची क्षेत्रवार विभागणी असणार आहे. येथे प्रत्येक पक्ष्यांच्या प्रजातीचे निवासस्थान उभारण्यात येणार आहे. रेड ब्रेस्टेड पॅराकीट, ब्लॉसम हेडेड पॅराकीट, व्हाईट पीकॉक, मलबार ग्रे हॉर्नबिल, ब्लॅक हंस, ब्लॅक मुनिया, कोकाटू गालाह, ओस्ट्रिचेस, स्कॉलेट अशा या काळाच्या ओघात लुप्त होणाऱ्या दुर्मीळ 18 प्रजातींचे 206 पक्षी येथे पाहता येणार आहेत. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वेचा मोठा निर्णय! 54 रेल्वे स्थानकांवर सुरु होणार डिजीटल सेवा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच मुलुंड पक्षी उद्यानाचे भूमिपूजन होईल. सुमारे २५ लाख लोकसंख्या असलेल्या पूर्व उपनगरातील नागरिकांना तसेच नवी मुंबई आणि ठाण्यातील रहिवाशांना या बर्ड पार्कमुळे विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होईल. ब्रिटिशांनी एका शतकापूर्वी मुंबईत भायखळा येथे पहिले प्राणीसंग्रहालय उभारले होते. त्यानंतर आता इतक्या वर्षांनी पूर्व उपनगरात पक्षीगृह उभारण्यात येत आहे.

    follow whatsapp