नाद करती काय?! 500 डझन केळी, 100 पाण्याचे बॉक्स अन् बरंच काही... हॉटेल तिरंगाच्या मालकाकडून आंदोलकांना ट्रकभरून मदत

Maratha protest : मराठा बांधवांची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून हॉटेल तिरंगाचे मालक लक्ष्मण भोसलेंनी आंदोलकांना जेवण पाठवले आहे.

hotel tiranga owner laxman bhosale help to maratha protesters

hotel tiranga owner laxman bhosale help to maratha protesters

मुंबई तक

31 Aug 2025 (अपडेटेड: 31 Aug 2025, 03:09 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मराठा आंदोलकांना गावाकडून जेवणाची सोय

point

हॉटेल तिरंगाच्या मालकाकडून जेवणाची सोय

Maratha Protest : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 31 ऑगस्ट रोजी तिसरा दिवस आहे. याचपार्श्वभूमीवर असंख्य मराठा बांधव मुंबईत आंदोलन करत आहेत. मात्र, याच मुंबईकरांची गैरसोय झाल्याचं दिसून येतंय. शौचालय, पाणी आणि खाऊ गल्ली बंद करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनंतर शौचालये खुली करण्यात आली आहेत. तसेच कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून आता गावाकडून मुंबईकडे जेवण पाठवलं जात आहे. अशातच आता हॉटेल तिरंगाचे मालक लक्ष्मण भोसलेंनी आंदोलकांना जेवण पाठवले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Manoj Jarange Patil : ‘फडणवीसनं दोन खून केलेत’, जरांगे-पाटलांची स्फोटक मुलाखत

'तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी'

हॉटेल तिरंगाचे मालक भोसले हे नेहमी चर्चेत असतात, पण आता ते एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांनी मुंबईतील मराठा आंदोलकांना जेवणाची सोय केली आहे. मुंबईत असलेल्या मराठा बांधवांसाठी पाण्याची आणि जेवणाची गैरसोय जाणवत असल्याने आम्ही ही व्यवस्था केली आहे. तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे ते म्हणाले.

सुका खाऊ ट्रकद्वारे मुंबईकडे 

या मदतीत 500 केळी, 100 बिसलेरी बॉक्स, 150 डझन बिस्किटे आणि फरसाणचाही समावेश असून हा सर्व साठा मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात येत आहे. तसेच काही मराठा बांधव हे मुंबईस्थित असलेल्या तसेच मुंबई उपनगरस्थित असलेल्या नातेवाईकांकडून राहत आहेत.

हे ही वाचा : 'आरक्षणावर सरकार कसलाही तोडगा...' सोशल मीडियावर पोस्ट अन् राहत्या घरात मराठा तरुणाची गळफास घेत आत्महत्या

मनोज जरांगे आझाद मैदानावर धडकल्यानंतर महापालिका प्रशासनाने पाणी, खाऊ गल्ली आणि शौचालयांना कुलूप लावून ठेवले होते. यामुळे मराठा आंदोलक संतापले. यावर मनोज जरांगे पाटलांनी हे सरकार इंग्रजांहून भयंकर असल्याचं वक्तव्य केलं होतं.

    follow whatsapp