शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत केले अश्लील चाळे, नंतर हॉटेलमध्ये बोलावलं, पालक संतापले अन् नंतर घडलं..

School Teacher Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या मेरठ परीक्षितगढ विभागातील एका इंटर कॉलेजमध्ये खळबळजनक घटना घडली. एका शिक्षकारने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत अश्लील बोलणं केलं आणि तिला हॉटेलमध्ये येण्यासाठी सांगितलं.

शाळकरी मुलगी दुःखी आणि रडत आहे

School Girl Shocking News

मुंबई तक

31 Aug 2025 (अपडेटेड: 31 Aug 2025, 04:17 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षकाने शाळेतील विद्यार्थीनीसोबत केलं घाणेरडं कृत्य

point

पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ठोकल्या बेड्या

point

त्या शाळेत नेमकं घडलं तरी काय?

School Teacher Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या मेरठ परीक्षितगढ विभागातील एका इंटर कॉलेजमध्ये खळबळजनक घटना घडली. एका शिक्षकारने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत अश्लील बोलणं केलं आणि तिला हॉटेलमध्ये येण्यासाठी सांगितलं. त्यानंतर विद्यार्थीनीने या धक्कादायक प्रकाराबाबत कुटुंबियांना माहिती दिली. कुटुबियांनी पोलिसांना याबाबत सांगितलं पण पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यानंतर हे प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं आणि त्यानंतर आरोपी शिक्षका विरोधात तक्रार नोंदवण्यात आली. शुक्रवारी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आणि कॉलेज प्रशासनानेही शिक्षकाला निलंबीत केलं. 

हे वाचलं का?

त्या शाळेत नेमकं घडलं तरी काय?

पीडित विद्यार्थीनीनं आरोप केलाय की, शिक्षक तिच्यासोबत अश्लील बोलणं करायचा. तीन दिवसांपूर्वी शिक्षकाने हॉटेलमध्ये येण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुरुवातीला तक्रार दाखल करून घेतली नाही आणि कोणतीही कारवाई केली नव्हती. पण विद्यार्थीनीने घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली आणि नंतर आरोपी शिक्षका विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. 

हे ही वाचा >> Manoj Jarange Patil : ‘फडणवीसनं दोन खून केलेत’, जरांगे-पाटलांची स्फोटक मुलाखत

पालकांमध्ये भीतीचं वातावरण

एका शाळेतील विद्यार्थीनीसोबत शिक्षकाने केलेला हा प्रकार संतापजनक असून पालकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. विद्यार्थी शाळेतच सुरक्षीत नसतील, तर मग कुठे सुरक्षीत राहतील? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. लोकांनीही यप्रकरणाची सखोल चौकशी केली आहे. तसच शाळा व्यवस्थापनानेही अशा घटनांबाबत नेहमी सतर्क राहिलं पाहिजे, असं आवाहन केलं आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांसोबत अशाप्रकारची धक्कादायक घटना घडणार नाही. 

हे ही वाचा >> गणेश चतुर्थी 2025: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पंडीत रसराज महाराज यांच्या हनुमान चालीसा पठणाचे आयोजन

    follow whatsapp