Mumbai: धावत्या ट्रेनमध्ये चोरी, पत्नीच्या पर्ससाठी पतीची उडी, पण चाकाखाली...

मुंबईत धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिलेची पर्स खेचत चोरीचा करण्यात आला. पतीने चोरी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता झटापटीत पती ट्रेनमधून खाली पडला आणि यात त्यांचा हात गमावल्याची बातमी समोर आली आहे.

धावत्या ट्रेनमध्ये चोरी, पत्नीच्या पर्ससाठी पतीची उडी

धावत्या ट्रेनमध्ये चोरी, पत्नीच्या पर्ससाठी पतीची उडी

मुंबई तक

• 01:34 PM • 07 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत एक्सप्रेस ट्रेनमध्ये चोरीचा प्रकार

point

चोराला रोखण्याच्या प्रयत्नात महिला ट्रेनमधून खाली...

point

झटापटीत महिलेच्या पतीला हात गमवावा लागला

Mumbai Train Incident: 4 जून रोजी पहाटे 3.35 वाजता मुंबईत धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिलेची पर्स खेचत चोरीचा करण्यात आला. यादरम्यान महिलेच्या पतीने दरोडेखोराला चोरी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत डॉक्टर असलेल्या पतीने त्याचा हात गमावला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे आता रेल्वे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. 

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी दिपाली देशमुख त्यांच्या मुलीसह मुंबईहून लोकमान्य टिळक टर्मिनस-नांदेड या एक्सप्रेस ट्रेनमधून नांदेडला जात होते. महिला मधल्या सीटवरुन तर योगेश वरच्या सीटवरुन प्रवास करत होते. 

प्रवासादरम्यान, पहाटे 3.35 वाजता ट्रेनचा वेग कमी झाल्यानंतर एक अज्ञात व्यक्ती ते ट्रेनमध्ये घुसली. ही व्यक्तीने दिपाली यांची पर्स खेचत ती चोरण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या पतीने त्या चोराकडून पर्स हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. महिला आणि त्या चोरामध्ये झटापट झाली आणि या गोंधळात महिला ट्रेनच्या दरवाजातून खाली पडली. पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात योगेश यांनी देखील ट्रेनमधून खाली उडी मारली आणि त्याचवेळी त्यांचा हात ट्रेनच्या चाकाच्या खाली आला आणि त्यांनी आपला हात गमावला. 

हे ही वाचा: भुलीचं इंजेक्शन देत पीडिता आयसीयुत भरती, नंतर केलं लैंगिक शोषण

जखमी अवस्थेत पतीला वाचवलं

या घटनेदरम्यान जखमी अवस्थेतील महिलेने पतीला रेल्वे ट्रॅकपासून दूर नेले आणि तिथल्या रिक्षा चालकाच्या मदतीने पीडित व्यक्तीला मुलुंडच्या फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, या जोडप्याच्या मुलीला कल्याण स्टेशनवर सुरक्षितरित्या सोडण्यात आलं. 

हे ही वाचा: चोराच्या उलट्या बोंबा! पोलीस असल्याची खोटी ओळख, लंपास केले 2.89 कोटी नंतर...

या घटनेची माहिती कळताच, अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आणि त्यांचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

    follow whatsapp