महिलेला भूलीचं इंजेक्शन देत रात्रभर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी केलं लैंगिक शोषण, पतीला कळताच...

मुंबई तक

Crime News : राजस्थानातील अलवर येथील एमआयएम इंडस्ट्रियलच्या परिसरातील ईएसआयसी मेडिकल कॉलेजमधील आयसीयु वॉर्डमध्ये एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 4 जून रोजी रुग्णालयातील नर्सिंग स्टाफने पीडितेला भूलीचे इंजेक्शन देत नंतर बलात्कार करण्यात आला. 

ADVERTISEMENT

Crime News Victim admitted to ICU after being injected with a fake medicine, later sexually abused
Crime News Victim admitted to ICU after being injected with a fake medicine, later sexually abused
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रुग्णालयात 32 वर्षीय महिलेवर बलात्कार

point

ईएसआयसी रुग्णालयाचा कारभार उघड

Crime News : राजस्थानातील अलवर येथील एमआयएम इंडस्ट्रियलच्या परिसरातील ईएसआयसी मेडिकल कॉलेजमधील आयसीयू वॉर्डमध्ये एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 4 जून रोजी रुग्णालयातील नर्सिंग स्टाफने पीडितेला भूलीचे इंजेक्शन देत नंतर बलात्कार करण्यात आला. 

हेही वाचा : चोराच्या उलट्या बोंबा! पोलीस असल्याची खोटी ओळख, लंपास केले 2.89 कोटी नंतर...

रात्रीच्या वेळी पीडितेचे कुटुंब आयसीयू वॉर्डच्या बाहेर बसले होते. त्यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पीडितेच्या नातेवाईकांना पीडितेवरील बलात्काराबाबत माहिती दिली. त्यावेळी महिला पीडिता ही बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडली असून मद्यधुंद होती. सकाळ होताच पीडितेच्या कुटुंबियांना बलात्काराची माहिती दिली. मेडिकल कॉलेज प्रशासनाने हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून एफआरआय दाखल करुन पुढील तपासणीस सुरूवात केली आहे. 

तक्रारीत नेमके आरोप काय? 

तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार सांगितलं की, ईएसआयसी मेडिकल कॉलेजच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलेल्या वॉर्डमध्ये वय वर्षे 32 वर्षीय पत्नीवर 4 जुलै रोजीच्या रात्री नर्सिंग स्टाफने बलात्कार केला. आरोपीने कॉटच्या चारही बाजूला खांब लावलेले होते. त्या खाटेवर तिला झोपवून तिला इंजेक्शन दिले आणि आरोपी महिलेवर बलात्कार करण्यात आला. अशावेळी महिलेनं प्रतिकार करुनही ती स्वत:ला नराधाम्यांपासून वाचवू शकली नाही. अशावेळी तिने आपल्या पतीचं नाव घेण्यास सुरुवात केली. 

महिलेच्या वारंवार ओरडण्यावरुन, आयसीयू कर्मचाऱ्यांनी वॉर्डबाहेर बसलेल्या तिच्या पतीला बोलावले. यादरम्यान, महिला थोडीशी नशेत होती आणि तिने आपल्या पतीला घडलेला प्रसंग सांगत होती. तिला एकूण घडलेल्या प्रसंगाबाबत माहिती मिळाली नाही. काही वेळानंतर महिला झोपली. सकाळी शुद्धीवर आल्यानंतर तिने तिच्या पतीसोबत घडलेला प्रसंग सांगितला. 

पीडितेसोबत असणाऱ्या एका महिलेच्या पतीने सांगितले की, रात्रीच्या वेळी नर्सिंग स्टाफने वाईट कृत्य केलं. पीडितेच्या पतीने वैद्यकीय महाविद्यालाच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली तेव्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांसमोर पीडिता आणि तिच्या कुटुंबियांची माफी मागितली. पोलिसांनी या प्रकरणात एफआरआय नोंदवून पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आणि 164 अंतर्गत जबाब नोंदवला आहे. 

हेही वाचा : गुरु आणि शुक्र 12 वर्षानंतर येणार एकत्र, 'या' राशीतील लोकांची आर्थिक चणचण होणार दूर

संबंधित प्रकरणात पोलीस म्हणाले की, पीडितेचे व्हिडिओ स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले. त्यात तिने स्पष्टपणे म्हटलं की, रुग्णालयातील नर्सिंग स्टाफने तिच्यावर बलात्कार केला. दुसरीकडे, रुग्णालय प्रशासनाने संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, प्रकरणात पीडितेनं सांगितलं की, आरोपीने गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. पोलीस संबंधित प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp