पत्नी चिडली अन् वाट लागली.. रात्री अडीच वाजता पतीच्या तोंडावर फेकली 'ती' गोष्ट, ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही!

Husband And Wife Shocking Viral News : ठाणे जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घरगुती वादविवादामुळे एका महिलेनं तिच्या पतीच्या अंगावर उकळतं तेल फेकलं.

Husband And Wife Shocking Viral News

Husband And Wife Shocking Viral News

मुंबई तक

06 Jun 2025 (अपडेटेड: 06 Jun 2025, 11:37 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कल्याणमध्ये पत्नीने पतीला जाळलं..

point

घरगुती वादामुळे पत्नीने पतीवर काढला राग

point

पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात केला गुन्हा दाखल

Husband And Wife Shocking Viral News : ठाणे जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घरगुती वादविवादामुळे एका महिलेनं तिच्या पतीच्या अंगावर उकळतं तेल फेकलं. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.  याप्रकरणी पोलिसांनी महिले विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

हे वाचलं का?

रात्री पत्नीने नवऱ्यासोबत केला भयंकर कृत्य..नंतर काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात बुधवारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, जखमी झालेला व्यक्ती ऑटो रिक्षा चालक असून तो 48 वर्षांचा आहे. इमरान अब्दुल गफ्फार शेख असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. शेखचं घरगुती कारणावरून पत्नीसोबत भांडण झालं होतं.

हे ही वाचा >> हनिमूनला गेलेल्या कपलसोबत काय घडलं, पतीची हत्या.. पत्नी बेपत्ता; ही मर्डर मिस्ट्री तुमचं डोकंच टाकेल चक्रावून!

दोघांमध्ये वाद इतका वाढला की, महिलेनं रागाच्या भरात गरम तेल इमरानच्या अंगावर फेकलं. गरम तेल टाकल्याने इमरानचं डोकं, चेहरा, डोळे आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी माहिती दिली की, गरम तेलाने भाजलेल्या इमरानला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.

इमरानची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु केला. पोलिसांनी साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यासही सुरुवात केली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, प्राथमिक तपासात हा घरगुती वाद असल्याचं समोर आलंय. जस जसं तपास पुढे जाईल, त्या आधारावर कारवाई केली जाईल.

हे ही वाचा >> ShivSena UBT-MNS: 'जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल', उद्धव ठाकरेंचं मनसेसोबतच्या युतीवर सर्वात मोठं विधान!

    follow whatsapp