जावयासोबत पळून गेलेल्या सासूबाबत समोर आली 'ती' माहिती, आता दोघंही...

अलीगढमधील आपल्या मुलीच्या लग्नाआधीच होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या सपनादेवी बद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. राहुल आणि अनिता सध्या कुठे आहेत? हे उघडकीस आलं आहे.

जावयासोबत पळून गेलेल्या सासूबाबत समोर आली 'ती' माहिती

जावयासोबत पळून गेलेल्या सासूबाबत समोर आली 'ती' माहिती

मुंबई तक

• 04:02 PM • 06 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

जावयासोबत पळून गेलेली सासू आता कुठे आहे?

point

राहुल आणि अनिता आता कुठे राहतात?

point

जावयासोबत पळून सासूची नवी माहिती उघडकीस

Aligarh News: अलीगढमध्ये मुलीच्या लग्नाआधी जावयासोबत पळून गेलेल्या सासूमुळे एकच खळबळ उडाली होती. या बातमीमुळे जावई राहुल आणि सासू अनितादेवीची लव्ह स्टोरी खूपच व्हायरल झाली. फरार झाल्याच्या 10 दिवसांनंतर राहुल आणि अनिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी अनिता आणि राहुलला सोडून दिलं. मात्र, पोलिसांनी सोडून दिल्यानंतर अनिता आणि राहुलला कुटुंबियांनी स्वीकारण्यास नकार दिला. 

हे वाचलं का?

बऱ्याच दिवसांपासून दोघांचीही काहीच खबर नव्हती. पण आता जावई आणि त्याची नवी बायको नेमके कुठे आहेत? याचा खुलासा झाला आहे. दोघंही गुजरातमध्ये कुठेतरी राहत असल्याचं समोर आलं आहे. 

काय होतं नेमकं प्रकरण?

मडराकच्या मनोहरपूर कायस्थ गावातील जितेंद्र नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न दादोंच्या मचरिया गावातील राहुलशी ठरलं होतं. लग्नाची वरात 16 एप्रिल रोजी येणार होती. पण त्याआधी 6 एप्रिल रोजी अनिता आपल्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत म्हणजेच जावयासोबत पळून गेली. खरंतर, जितेंद्र यांची बायको अनिता हिचे राहुलसोबत प्रेमसंबंध होते. पळून गेल्यानंतर ते दोघे काही दिवस फरार होते. 

हे ही वाचा: आईनेच 17 वर्षाच्या लेकीला संपवलं! मावस, चुलत भावांनी साथ दिली, प्रेमाचा दी एंड कसा झाला?

फरार झाल्याच्या 10 दिवसांनंतर त्या दोघांचा शोध लागला आणि पोलिसांनी बिहारमधून त्यांना ताब्यात घेतलं. यादरम्यान अनिताचा हट्ट होता की तिचा पती जितेंद्र तिला त्रास देत असल्यामुळे ती तिच्या जावयाकडेच राहील. त्यादरम्यान त्या दोघांच्या (राहुल आणि सपना) लग्नाबद्दलची बातमी समोर आली. यानंतर पोलिसांनी त्या दोघांना सोडून दिलं. 

हे ही वाचा: Snapchat वरून मुंबईतील अल्पवयीन मुलीसोबत नको 'ते' केलं, कॉलेजच्या तरुणाला ठोकल्या बेड्या

पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर राहुल सपनाला त्याच्या गावी घेऊन गेल्याचं वृत्त समोर आलं, पण तिथल्या लोकांनी दोघांनाही विरोध केला. राहुल आधीपासूनच गुजरातमध्ये काम करत असल्यामुळे ते दोघं आता गुजरामध्ये राहत असल्याची बातमी समोर आली आहे. 

    follow whatsapp