Snapchat वरून मुंबईतील अल्पवयीन मुलीसोबत नको 'ते' केलं, कॉलेजच्या तरुणाला ठोकल्या बेड्या

मुंबई तक

मुंबईतील एका अल्पवयीन मुलीला स्नॅपचॅटवरून मॉर्फ फोटोजद्वारे ब्लॅकमेल आणि लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गुजरातमधील जामनगर येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अटक करण्यात आली.

ADVERTISEMENT

Snapchat वरून अल्पवयीन मुलीसोबत कॉलेजच्या मुलाने असं काय केलं?
Snapchat वरून अल्पवयीन मुलीसोबत कॉलेजच्या मुलाने असं काय केलं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

Snapchat वरून फोटोज मॉर्फ करून धमकी

point

अश्लील पद्धतीने फोटोज मॉर्फ करून व्हायरल करण्याची धमकी

point

महाविद्यालयीन तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत असं का केलं?

Mumbai News: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून झालेल्या मैत्री संबंधातून बऱ्याच मोठ्या आणि धक्कादायक घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच मुंबईतील एका अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील एका अल्पवयीन मुलीला सोशल मीडियाद्वारे ब्लॅकमेल आणि लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गुजरातमधील जामनगर येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने त्या अल्पवयीन मुलीचे फोटोज अश्लील पद्धतीने मॉर्फ केले. त्यानंतर तिला हे फोटोज दाखवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. 

वडिलांना फोनवरून धमकी

या घटनेतील पीडित 15 वर्षीय मुलीचे स्नॅपचॅटवर एक अकाउंट होते. या अंकाउंटद्वारे एका जामनगरमधील महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलासोबत तिचा संपर्क होत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि त्यावेळी एका 19 वर्षीय तरुणाने त्याच्या मुलीचे अश्लील फोटो असल्याचा दावा केला. इतकेच नव्हे त्याने मुलीचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मुलीने तिच्या वर्गातील मुलाशी संवाद साधणे थांबवावा अशी आरोपी तरुणाची मागणी होती.

सोशल मीडिया अॅपवरून झाली ओळख

मुलीच्या वडिलांनी तिला याबद्दल विचारले असता, तिने अलीकडेच सोशल मीडिया अॅपवर एका मुलाशी मैत्री केली असून त्याच्याशी संवाद साधत असल्याचं सांगितलं. या काळात त्या मुलीने तिचे बरेच फोटोज देखील शेअर केले होते. अरोपी तरुण त्या मुलीच्या वर्गातील मुलांसोबत विशेषत: आयुष नावाच्या मुलासोबत मैत्रीवरून सतत भांडत होता. 

हे ही वाचा: "मला कमी कपडे घालणाऱ्या मुली...", भाजप मंत्र्यांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

मॉर्फ केलेले फोटोज पाठवून ब्लॅकमेल 

काही दिवसांनंतर, कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात असलेल्या आरोपी तरुणाने त्या मुलीला तिचे मॉर्फ केलेले फोटोज पाठवले. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "फोटोंमधील चेहरा पीडितेचा होता, पण तो एका अश्लील शरीराशी डिजिटली जोडला गेला होता. आरोपीने मोबाइल अॅप्लिकेशन्स वापरून हे फोटो एडिट केले होते," 

त्याने तिला धमकावण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी या मॉर्फ केलेल्या फोटोजचा वापर केला. तसेच, आयुष आणि तिच्या इतर पुरुष मित्रांशी संबंध तोडण्यासाठी तिच्यावर दबाव आणला.

हे ही वाचा: लग्नाच्या 12 वर्षानंतर सुनेचे सासरच्यांवर छळाचे आरोप, हायकोर्टाचा सुनेलाच दणका, अकोल्याचं प्रकरण काय?

पोलिसांकडून गुन्हा दाखल 

मुलीकडून सर्व माहिती कळल्यानंतर, पीडितेच्या वडिलांनी अँटॉप हिल पोलिसांशी संपर्क साधला आणि संपूर्ण घटना सांगितली. तातडीने एफआयआर नोंदवण्यात आली आणि चौकशी सुरू करण्यात आली. पोलिसांनी आरोपीचे स्नॅपचॅट अकाउंट जामनगरमध्ये ट्रेस केले आणि त्याला पकडण्यासाठी एक पथक पाठवले. चौकशीदरम्यान, आरोपी पीडित मुलीच्या पुरुष वर्गमित्रांशी असलेल्या तिच्या जवळीकतेमुळे रागावला होता आणि याचा सूड घेण्यासाठी त्याने हे कृत्य केलं असल्याचं त्याने कबूल केलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp