Govt Jobs : स्टेशन मास्टरच्या 1250 पदांसाठी भरती, काय आहेत पात्रतेचे निकष?

मुंबई तक

21 Oct 2026 (अपडेटेड: 21 Oct 2026, 04:19 PM)

भारतीय रेल्वेने स्टेशन मास्टर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. तब्बल 1250 जागांसाठी ही भरती होणार आहे.

Indian Railway Recruitment 2026

Indian Railway Recruitment 2026

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर पदासाठी भरती

point

कसा कराल अर्ज?

Indian Railway Recruitment 2026 : भारतीय रेल्वेने नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे भरती मंडळातर्फे (RRB) देशभरात 'स्टेशन मास्टर' या महत्त्वाच्या पदासाठी तब्बल 1250 जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत. या भरतीमुळे रेल्वे विभागात सरकारी नोकरी मिळवण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

हे वाचलं का?

पात्रतेचे निकष

या भरतीसाठी उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2027 रोजी 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली असून, अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांपर्यंत वयोमर्यादेत सूट मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार 'लेव्हल-6' (Level-6) च्या श्रेणीमध्ये आकर्षक वेतन श्रेणी व भत्ते दिले जातील.

हे ही वाचा : उपोषणाला बसतो अन् बाथरुममध्ये खातो; कदमांच्या जहरी टीकेनंतर जरांगे भडकले; म्हणाले, “थोरली बेगम”

अर्जासंबंधी महत्त्वाच्या तारखा

या पदासाठी भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज नोंदणी 27 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2026 आहे. परीक्षा शुल्क व इतर सविस्तर तपशील लवकरच प्रसिद्ध केला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही सेवा देण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

हे ही वाचा : आरोपीची गर्लफ्रेंड राधा अन् तिच्यासोबत बबिता... टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी नवी खळबळजनक माहिती

'असा' करा अर्ज

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज वेळेत भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवावी. या भरतीशी संबंधित अधिकृत सूचना, सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी रेल्वे भरती मंडळाच्या rrb.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.