Mumbai Crime: 25 ऑगस्ट रोजी सकळी नवी मुंबईतील उरण परिसरात हृद्रयद्रावक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथील पगोटेगाव गावात एका महिलेला जाळण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. याबद्दल माहिती मिळताच स्थानिकांनी महिलेला त्वरील रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
ADVERTISEMENT
घटनेत मृत पावलेल्या महिलेचं नाव जगरानी असून तिचं वय 32 वर्षे असल्याची माहिती आहे. त्यावेळी पीडितेचा पती राजकुमार राम शिरोमणि साहू (35 वर्षे) आपल्या पत्नीने स्वत:ला खोलीत बंद करून जाळून घेतल्याचं सर्वांनाच रडत रडत सांगत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचं पीडितेच्या पतीने सांगितलं. प्राथमिक अंदाजानुसार, पोलिसांना पतीचं म्हणणं खरं वाटलं आणि पोलिसांनी आकस्मिक मृत्यू झाल्याचं मानून गुन्हा दाखल केला. मात्र, हे प्रकरण इतकं सरळ नव्हतं.
अनैतिक संबंधाचा संशय
खरं तर, जगरानीचा पती तिच्यावर नेहमी संशय घ्यायचा. त्याच्या मते, पत्नीचं दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध सुरू होते. पीडितेच्या पतीच्या मनात हा संशय वाढत गेला आणि एके दिवशी त्याने असं पाऊल उचललं, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
हे ही वाचा: PM मोदींनंतर पंतप्रधानपदाचा दावेदार कोण? 28 % लोकांचा अमित शाहांना सपोर्ट, योगी आणि गडकरींचं काय? MOTN सर्व्हे वाचा
मुलीने आणलं उघडकीस
पोलिसांनी प्रकरणाच्या तपासादरम्यान, जगरानीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स पाहिले आणि फॉरेन्सिक पुरावे जमा केले. यादरम्यान, पोलिसांनी पीडितेच्या 7 वर्षांच्या मुलीची चौकशी केली. चौकशीदरम्यान, मुलीने घाबरत घाबरत सत्य घटना सांगितली. तिने सांगितलं की, "पप्पांनी मम्मीला जाळून टाकलं, मी सगळं पाहिलंय." मुलीचा हा जबाब ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही फूटेज तपासले. फूटेजमध्ये राजकुमार सकाळच्या वेळेत घरातून बाहेर निघताना दिसला. मात्र, चौकशीदरम्यान राजकुमारने आपण घटनेच्या वेळी घरात नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे या पुराव्यामुळे सत्य घटना बाहेर आली.
सत्य घटना आली समोर
इतकेच नव्हे तर, जगरानीने स्वत:ला जाळून घेतलं नसून तिला बळजबरीने जाळण्यात आल्याचं मेडिकल रिपोर्ट्समधून समोर आलं. सगळे पुरावे आणि मुलीच्या जबाबाच्या आधारे, पोलिसांकडून 26 ऑगस्ट रोजी राजकुमारच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी पतीला अटक करण्यात आली.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबई ते रत्नागिरी पर्यंतचा प्रवास केवळ 5 तास... ‘ही’ सेवा पुढच्या महिन्यातच होणार सुरू!
प्रकरणाचा तपास सुरू..
वरिष्ठ निरीक्षक हनीफ मुलानी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, "ही आत्महत्या नसून हत्येचं प्रकरण आहे आणि यात काहीच शंका नाही. घरगुती हिंसाचार आणि संशयातून उद्भवणारी ही एक भयानक घटना आहे."
ADVERTISEMENT
