Mumbai Crime : बोरिवलीच्या पश्चिम भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी सायंकाळी सुधीर फडके पुलाखाली एका 29 वर्षीय महिलेचे लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. कामावर जाणाऱ्या तक्रारदार महिलेला एका पुरुषाने अडवले आणि पुलाखालील एका निर्जनस्थळी ओढून नेत तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : आईचा धाकट्या मुलावर जीव, थोरल्याने स्वयंपाकघरातून चाकूने दोघांवरही केले सपासप वार, नंतर पोलीस ठाणे गाठून...
नेमकं काय घडलं?
संबंधित गुन्ह्याच्या प्रकरणातीलआरोपीचे नाव समोर आले आहे. आरोपीचे नाव संजय राजपूत असे आहे. तो दहीसर प्रेमनगर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तो हॉटेलमध्ये धुणी भांडीचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवतो, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
पीडितेनं नराधमापासून बचाव करण्यासाठी काय केलं?
अशा स्थितीत पीडितेनं बचाव करण्यासाठी आपल्याकडील असलेले दागिने, मोबाईल फोन आरोपीला देण्यात आले. यानंतर पीडित महिलेनं घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यानंतर तिने बोरिवली पोलीस ठाणे गाठलं आणि घडलेल्या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली.
गु्न्हा दाखल झाल्यानंतर, झोन 11 चे उपायुक्त संदीप जाधव यांनी एक विशेष पथक तयार केले आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी युनिटकडे काम सोपवले होते. रात्रभर सुरु असलेल्या शोधानंतर, उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली मालाड पोलिसांनी शोध घेत आरोपीला अटक केली आणि बोरिवली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अशातच आता पोलिसांनी तपासादरम्यान, काही वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.
हे ही वाचा : दिल्लीत झालेल्या स्फोटात भाजप नेत्याचा मुलगा जखमी, कुटुंबीयांनी सांगितली स्फोटाची कहाणी
पोलिसांनी महिलेच्या कानातील सोन्याच्या वस्तू, अंगठी, मोबाईल फोन आणि हेडफोन आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. या एकूण वस्तूंचा खर्च एकूण 52 हजार असल्याचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT











