Mumbai Crime : मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक तरुण रस्त्यावरून फिरणाऱ्या महिलांच्या छातीला स्पर्श केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी संबंधित आरोपीला महिलांची छेडछाड करणाऱ्या आरोपीला अटक केली, या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासले. आश्चर्याची बाब म्हणजे, तपासातून, असे उघड झाले की तो केवळ एकच नाही, तर अनेक प्रकरणांत त्याचे नाव होतं. संबंधित तरुणाचे नाव मुनवर नासिर खान असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मुनवर हा आरे कॉलनीतील रहिवासी आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अशोक खरातचा सीडीआर कोणाकडून मिळाला? विरोधकांच्या आरोपांनंतर अंजली दमानियांचा खुलासा, डोळे पाणावले!
व्यक्ती राँगसाईटने आला आणि तरुणीच्या छातीला स्पर्श केला
बांगूर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी रवींद्र आव्हाड यांनी सांगितलं की, 30 मार्च रोजी सुमारे साडेनऊ वाजता एक तरुण घरी परतत होती. ती आपल्या कुटुंबासोबत रात्रीच्या जेवणासाठी गोरेगाव कॉम्प्लेक्सजवळील एका हॉटेलमध्ये गेली होती. जेवण झाल्यानंतर ती आपल्या कुटुंबासोबत बाहेर पडली असता, एक व्यक्ती राँगसाईटने आला आणि तरुणीच्या छातीला स्पर्श केला.
कुटुंबियांनी पाठलाग केला असता, तरुण घटनास्थळावरून पळाला
दरम्यान, कुटुंबियांनी त्याचा पाठलाग केला असता, पण तो घटनास्थळावरून निसटून गेला. त्यांनी दुचाकीवरील नंबर घेतला, नंतर बांगूर नगर पोलिसांना याबाबत तक्रार नोंदवली. पीडितेनं तात्काळ बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे प्रकरण गंभीर मानून, पोलिसांनी आरोपीला ओळखण्यासाठी परिसरातील एकूण 29 सीसीटीव्हीचा तपास केला. सततच्या तांत्रिक तपासाच्या आणि सांघिक प्रयत्नांच्या जोरावर, पोलिसांनी केवळ 48 तासांच त्याचा माग काढला, त्याची ओळख पटवली आणि त्याला अटक करण्यात आली.
हे ही वाचा : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने मनगटावर केले 18 वार, प्रेम प्रकरण की आणखी काही? नेमकं काय घडलं?
आरोपी तरुणाला अटक
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आरे कॉलनीचा रहिवासी आहे. त्याला मयूर नगरमधील जेमिनी एसआरए बिल्डिंगमधून अटक करण्यात आली. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या अटकेनंतर, पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. बांगूर नगर पोलिसांनी सांगितलं की, मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी त्याने एका तरुणीसोबत असा गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणाची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ADVERTISEMENT











