अशोक खरातनंतर नाशिकमधून आणखी एक अश्लील व्हिडिओ स्कँडल, पेनड्राइव्हमध्ये 121 अश्लील क्लिप्स

मुंबई तक

• 06:43 PM • 05 Apr 2026

Nashik crime : अशोक खरात प्रकरणांनतर नाशिकमधूनच उघड झालेल्या या नव्या प्रकरणातला सर्वात मोठा धक्का म्हणजे फिर्यादीच आरोपी ठरला आहे.” एका 63 वर्षीय वृध्द व्यक्तिने खंडणीची फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांच्या तपासात जे समोर आलंय ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते पुढे जाणून घेऊयात. 

Nashik crime

Nashik crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

 महिलेचा रविंद्र एरंडेविरोधात थेट लैंगिक अत्याचाराचा आरोप

point

4 व्यक्ती अश्लील व्हिडिओची धमकी देत खंडणीची मागणी करत होते

Nashik Crime : अशोक खरात प्रकरणांनतर नाशिकमधूनच उघड झालेल्या या नव्या प्रकरणातला सर्वात मोठा धक्का म्हणजे फिर्यादीच आरोपी ठरला आहे.” एका 63 वर्षीय वृध्द व्यक्तिने खंडणीची फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांच्या तपासात जे समोर आलंय ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते पुढे जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 80 मुलं-मुली आक्षेपार्ह अवस्थेत ताब्यात, मॅरेज हॉलमध्ये सुरु होता भलताच प्रकार, 31 अल्पवयीनांचा समावेश

एका खंडणी प्रकरणाने हे प्रकरण सुरु झालं. 2 एप्रिल रोजी सातपूर पोलीस ठाण्यात एक खंडणी प्रकरण दाखल झालं होतं. त्याच अनुषंगाने पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, पेनड्राईव्ह आणि मेमरी कार्ड जप्त केलं. मात्र, या तपासादरम्यान पुढे जे समोर आलं, त्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त झाल्याची माहिती समोर आली. या डिजिटल पुराव्यांमध्ये तब्बल 121 अश्लील व्हिडिओ क्लिप्स आढळून आल्या. या प्राथमिक तपासातून असं आढळून की, व्हिडिओंमध्ये दिसणारी व्यक्ती म्हणजेच या प्रकरणातला मूळ फिर्यादी सातपूरचा रहिवाशी रविंद्र एरंडे (वय 63) आहे.

 महिलेचा रविंद्र एरंडेविरोधात थेट लैंगिक अत्याचाराचा आरोप

या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतलं, जेव्हा एका महिलेने सातपूर पोलिसांशी संपर्क साधत त्या व्यक्तीविरोधात म्हणजे रविंद्र एरंडेविरोधात थेट लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले. संबंधित प्रकरणात महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय, "सातपूर येथील रहिवाशी 63 वर्षीय रविंद्र एरंडेनं 'तुमच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देतो, तुमचे भविष्य उज्ज्वल करतो' असे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. तसेच मी अनुसूचित जातीची असल्याचे माहिती असूनही त्याचा गैरफायदा घेतला आणि नाशिक परिसरातील विविध हॉटेलमध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केले." या प्रकरणात आता अट्रोसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केलाय, तसेच आयटी ॲक्टअंतर्गतही कलमे लावण्यात लागू करण्यात आली आहेत. 

एरंडेने महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवत व्हिडिओ शूट केल्याचं तपासातून समोर 

आरोपी एरंडेने अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे गुप्त व्हिडिओ शूट केल्याचं तपासातून समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून, सध्या जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू आहे. तपासात समोर येणाऱ्या बाबींवरून हे केवळ एक वेगळं प्रकरण नसून, यामागे मोठं सेक्स रॅकेट किंवा संघटित स्वरूपातील गुन्हेगारी जाळं असण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय.

4 व्यक्ती अश्लील व्हिडिओची धमकी देत खंडणीची मागणी करत होते

या प्रकरणाची माहिती देताना पोलीस उपायुक्त किशोर काळे म्हणालेत की, "रवींद्र एरंडे याला 4 व्यक्ती अश्लील व्हिडिओची धमकी देत खंडणी मागत होते. त्याने याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी खंडणीखोरांना पकडत अधिक तपास केला तेव्हा आरोपींकडून मिळालेल्या हार्ड डिस्क व पेनड्राइव्हमध्ये 121 व्हिडिओ आढळून आले. हे व्हिडिओ 2003 पासून आतापर्यंतचे आहेत. आम्ही याचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात सध्या एक पीडिता समोर आली आहे. तिच्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी अटकेत असून पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी हे करत आहेत," अशी माहिती उपायुक्त काळे यांनी दिलीय.

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जो व्यक्ती स्वतः खंडणीचा बळी असल्याचा दावा करत होता, तोच आता गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी म्हणून समोर आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

हे ही वाचा : शेतात नेऊन अल्पवयीन मुलीच्या तोंडात फडकं कोंबलं, चौघांकडून सामुहिक बलात्कार, अश्लील व्हिडीओही बनवला

दरम्यान, या घटनेमुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी नागरिकांना आणि विशेषतः संभाव्य पीडितांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आता या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना, आणखी किती धक्कादायक गोष्टी समोर येणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.