शेतात नेऊन अल्पवयीन मुलीच्या तोंडात फडकं कोंबलं, चौघांकडून सामुहिक बलात्कार, अश्लील व्हिडीओही बनवला
crime news : बिहारमध्ये महिला व बाल सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पूर्णियामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तर पाटण्यात ३ वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच काकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शेतात नेऊन अल्पवयीन मुलीच्या तोंडात फडकं कोंबलं
चौघांकडून सामुहिक बलात्कार, अश्लील व्हिडीओही बनवला
crime news : बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आलीये. सिकटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना गेल्या 25 मार्च रोजी घडली असून पीडितेच्या आईने शुक्रवारी सिकटी पोलीस ठाण्यात 4 नराधमांविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात 23 ते 25 मार्च दरम्यान एका सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि पीडितेचे कुटुंब या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 25 मार्चच्या संध्याकाळी पीडित मुलगी वैयक्तिक विधीसाठी घराबाहेर पडली असता, 4 युवकांनी तिचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने मक्याच्या शेतात नेले आणि तिथे तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आणि तपासाची दिशा
या अमानुष कृत्यानंतर नराधमांनी केवळ बलात्कारच केला नाही, तर पीडितेचा अश्लील व्हिडीओ देखील बनवला. ही घटना कोणाला सांगितल्यास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्यांनी मुलीला दिली होती, ज्यामुळे पीडिता प्रचंड दहशतीखाली होती. या भीतीमुळे तिने सुरुवातीला काहीही सांगितले नाही, मात्र नंतर तिने आपल्या आईला सर्व आपबीती सांगितली. पीडितेच्या आईने अर्जात नमूद केले आहे की, ग्रामीण स्तरावर पंचायतीमध्ये हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यामुळे पोलिसांत तक्रार देण्यास विलंब झाला. सिकटी पोलीस ठाण्याचे प्रभारी रोशन कुमार यांनी सांगितले की, 4 युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेची वैद्यकीय तपासणी आणि न्यायालयातील जबाब नोंदवण्यासाठी तिला अररिया येथे पाठवण्यात आले आहे. सध्या पोलीस फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.
हेही वाचा : बायकोने कापून टाकले नवऱ्याचे गुप्तांग, बॉयफ्रेंडला भेटण्यापासून रोखल्याने संतापली; नेमकं प्रकरण काय?









