बायकोने कापून टाकले नवऱ्याचे गुप्तांग, बॉयफ्रेंडला भेटण्यापासून रोखल्याने संतापली; नेमकं प्रकरण काय?
नवऱ्याने बायकोला तिच्या प्रियकरासोबत बघणे चांगलेच महागात पडले. यानंतर बायकोने प्रियकरासोबत व्यवस्थित प्लॅनिंग करुन नवऱ्याचे गुप्तांगाच कापून टाकले आहे. यानंतर पुढे पीडित नवऱ्यासोबत काय घडलं, जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायकोने कापून टाकले नवऱ्याचे गुप्तांग
बॉयफ्रेंडला भेटण्यापासून रोखल्याने संतापली
नेमकं प्रकरण काय?
Crime News : अनैतिक संबंधातून होणाऱ्या हत्यांमध्ये सातत्याने वाढ होताना पहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र या घटनेत नवऱ्याचा जीव जाता-जाता राहिला. मात्र त्याच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर इजा झाली आहे. त्याचं झालं असं की, पीडित पतीच्या पत्नीचे एका परपुरुषासोबत अनैतिक संबंध होते. याची कुणकुण पतीला लागली होती. एके दिवशी त्याने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत बघितले. यानंतर पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीचे गुप्तांगच कापून काढले आहे. नेमकी घटना काय आहे, सविस्तर जाणून घेऊया.
बायकोचे टिंकूसोबत अफेयर
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे निलेश आणि विनिता हे दोघे नवरा-बायको एका भाड्याच्या घरात राहतात. निलेश हा एका चपलांच्या कारखान्यात काम करतो. दोघांचं सगळं सुरळीत चालू असताना विनिताचे टिंकू नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण जुळले. नवरा कामावर गेला की विनिता टिंकूला बोलावून घेत असे.
पत्नीला प्रियकराला भेटण्यापासून रोखले
विनिताच्या या प्रकरणाची तिच्या पतीला म्हणजे निलेशला कुणकुण लागली. एके दिवशी त्याने विनिताला टिंकूसोबत पकडले. यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्याने विनिताला टिंकूला भेटण्यापासून रोखले. मात्र विनिता काही ऐकणाऱ्यातील नव्हती. तिने टिंकू आणि घर मालकासोबत मिळून एक प्लॅन बनवला आणि निलेशला धडा शिकवायचे ठरवले.
हे ही वाचा : रील करण्याच्या बहाण्याने गर्लफ्रेंडचे दोन्ही हात मागे बांधले, अन् थंड डोक्याने थेट गळा चिरुन टाकला, नेमकं कारण काय?
बायकोने केले गुप्तांगावर वार
केलेल्या नियोजनानुसार, विनिता, टिंकू आणि घरमालक या तिघांनी मिळून गुरुवारी रात्री 11 वाजता निलेशला कामावरुन घरी परतत असताना एकट्यात गाठले. त्याला दमदाटी करत त्याच्या गुप्तांगावर चाकूने वार केले आणि पसार झाले. या हल्ल्यामुळे निलेशच्या गुप्तांगाला गंभीर जखम झाली.









