मुंबईची खबर : मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा वेग संथ, पावसाळ्यापूर्वी 85 टक्के काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट

मुंबईत सध्या रस्ते काँक्रीटीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. यामुळे येऊ घातलेल्या पावसाळ्यापर्यंत ही कामे पूर्ण होणार का याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

mumbai news

mumbai news

मुंबई तक

05 Apr 2026 (अपडेटेड: 05 Apr 2026, 10:23 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचा वेग संथ

point

पावसाळ्यापूर्वी 85 टक्के काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट

Mumbai News : मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे कायमचे दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने रस्ते काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. यासाठी तब्बल 17 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र या काँक्रीटीकरणामुळे सध्या मुंबईकर वाहतूक कोंडी आणि खोदलेल्या रस्त्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. आधीच उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना यामुळे अधिक मनस्ताप  सहन करावा लागत आहे.

हे वाचलं का?

पालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत केवळ 54 टक्के रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून 26 टक्के कामे प्रलंबित आहेत, तर 20 टक्के रस्त्यांच्या कामाला अद्याप सुरुवातही झालेली नाही. या संथ गतीमुळे पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र 31 मे पर्यंत 85 टक्के काम पूर्ण करण्याचा निर्धार अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केला आहे.

प्रशासनाचे स्पष्टीकरण

हे काँक्रीटीकरण दोन टप्प्यात होणार आहे. यापैकी एकूण 2121 रस्त्यांपैकी 1151 रस्ते पूर्ण झाले आहेत, तर 558 रस्त्यांचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. उर्वरित 422 रस्त्यांच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे सुरक्षित स्थितीत आणली जातील आणि वाहतुकीसाठी रस्ते मोकळे केले जातील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 31 जूननंतर कोणत्याही रस्त्याचे काम अपूर्ण राहणार नाही किंवा कामामुळे वाहतूक वळवावी लागणार नाही, अशी ग्वाही पालिकेने दिली आहे.

हे ही वाचा : अशोक खरातचा मुलगा पळाला, मोबाईल बंद असल्याने SIT कडून शोध सुरु; नेमकं काय घडलं?

महानगर गॅस पाईपलाईनसाठी परवानगी

या काँक्रीटीकरणासोबतच महानगर गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदण्यास परवानगी देण्यात आली आहे. मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे गॅसपुरवठ्यात अडथळे येत आहेत. ते दूर करण्यासाठी ही मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यामुळे नुकत्याच तयार झालेल्या सिमेंटच्या रस्त्यांचे नुकसान होणार आहे.

हे ही वाचा :  आमदाराने स्वतः काच फोडून वाचवले ट्रक चालकाचे प्राण! नेमकं काय घडलं?

धुळीचा  आणि वाहतूक कोंडीचा सामना

मुंबई महानगरपालिकेच्या या काँक्रीटीकरण प्रकल्पामुळे मुंबईकरांना धुळीचा आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाढते प्रदूषण आणि त्यात उद्भवणाऱ्या या अशा परिस्थितीमुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ते काँक्रीटीकरणाचा १७ हजार कोटींचा प्रकल्प मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले आहे.