आमदाराने स्वतः काच फोडून वाचवले ट्रक चालकाचे प्राण! नेमकं काय घडलं?

मुंबई तक

मतदारसंघातील नुकसान पाहणी दौऱ्यावर असताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी अंतुर्ली फाट्याजवळ झालेल्या भीषण ट्रक अपघातात गाडीत अडकलेल्या चालकाला स्वतः पुढाकार घेऊन सुखरूप बाहेर काढले.

ADVERTISEMENT

muktainagar mla chandrakant patil personally smashed glass to save life of an accident involved truck driver what exactly happened
आमदाराने वाचवले ट्रक चालकाचे प्राण!
google news

मुक्ताईनगर: माणुसकी आणि धाडस यांचे एक अनमोल उदाहरण समोर आले आहे. मतदारसंघातील नुकसान पाहणी दौऱ्यावर असताना मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका भीषण ट्रक अपघातात गाडीत अडकलेल्या चालकाचे प्राण वाचवले. त्यांनी मदतीची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत ट्रकची काच फोडून जखमी चालकाला सुखरूप बाहेर काढले.

नेमकी घटना काय घडली?

आज आमदार चंद्रकांत पाटील हे आपल्या मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर होते. त्यांचा ताफा अंतुर्ली फाट्याजवळून जात असताना एक भीषण अपघात दिसला. एक ट्रक भीषण रीतीने उलटा पडला होता. ट्रकची केबिन पूर्णपणे मोडकळीस आली असल्याने चालक गंभीर जखमी अवस्थेत आत अडकला होता. केबिनचा दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता आणि बाहेरून उघडणे अशक्य झाले होते.

हे ही वाचा>> संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम बदलण्याची शक्यता?, नेमकं कारण काय?

परिस्थिती पाहताच आमदार पाटील यांनी तातडीने आपला ताफा थांबवला आणि घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आसपास कोणीही मदत करणारा नव्हता आणि वेळ काढल्यास चालकाचा जीव जाऊ शकतो, हे लक्षात घेऊन आमदारांनी कोणतीही मदत वाट पाहिली नाही. स्वतः पुढे होऊन त्यांनी ट्रकची काच जोरात फोडली आणि अडकलेल्या चालकाला बाहेर काढले.

चालक गंभीर जखमी झाला असल्याने आमदारांच्या सूचनेनुसार त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याला पुढील उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का?