संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम बदलण्याची शक्यता?, नेमकं कारण काय?
Pune News : चैत्र महिन्यात वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी संस्थानाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत संत ज्ञानेश्वरांच्या पालखीबाबत नियोजनाची आखणी करण्यात आली. याच पालखीच्या प्रस्थानाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'पुण्यात दोन दिवस ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम...'
पालखीचा दुसरा मुक्काम हा वडकी नाका येथे ठेवण्याची मागणी
पुण्याची गोष्ट : चैत्र महिन्यातील वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी संस्थानाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत संत ज्ञानेश्वरांच्या पालखीबाबत नियोजनाची आखणी करण्यात आली. राज्यभरात वारकरी सांप्रदायासह इतर लोक वारीची वाट पाहत असतात. अशातच आता यंदाच्या वारीला 8 जुलै रोजी आळंदीहून पंढरपूराकडे माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. दरम्यान, माऊलींच्या पालखीच्या पुण्यातील मुक्कामाबाबत एक मोठी माहिती समोर आली.
हे ही वाचा : अमरावती : तरुणीला पाहून पाच जणांमध्ये जागा झाला राक्षस, तिच्यावर जबरदस्ती करत जंगलात नेत नको तेच...
'पुण्यात दोन दिवस ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम...'
ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा 8 जुलै ते 25 जुलै या कालावधीपैकी पुण्यात दोन दिवस मुक्काम होणार आहे. अशातच संबंधित बैठकीत पुण्यातील मुक्कामाबाबत विविध अडचणी मांडण्यात आल्या आहेत. संत ज्ञानेश्वरांची पालखी ही पुण्यातील भवानी पेठेत दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. एकूण परिस्थिती पाहता, दिंड्या पालखीपर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या. मुक्कामाची जागा बदलल्याची मागणी बैठकीत केली. यामुळे आता पुण्यातील वडकी नाका परिसरात पालखीचा मुक्काम घेण्यात यावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
पालखीचा दुसरा मुक्काम हा वडकी नाका येथे ठेवण्याची मागणी
गतवर्षी पालखी पुण्याहून सासवडकडे जाण्यास रात्री 11 वाजले होते. हडपसर ते दिवेघाट येथे रस्त्यांचे काम सुरु होतं, दिंड्यांसह येणाऱ्या पालख्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. पालखीचा दुसरा मुक्काम हा वडकी नाका येथे ठेवावा, अशी मागणी या बैठीक केली असून ही माहिती लोकमत या वृत्तमाध्यमाने दिली.
हे ही वाचा : जिच्यावर विश्वास ठेवला, तिनेच पाठीत खंजीर खुपसला; मोलकरणीने मालकीणीला का संपवलं?
दरम्यान, संत ज्ञानेश्वार महाराज यांच्या पालखीच्या सोहळ्याचे प्रस्थान हे 4 वाजता होतं. पण, आता यात थोडा बदल करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी 3 वाजता प्रस्थान करेल, असे सांगण्यात येत आहे.









