Govt Jobs : सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार, 'या' बँकेत सुरु आहे भरती; लगेच करा अर्ज
सरकारी बॅकेत नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बदोडामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. अर्ज कसा करायचा आणि अर्ज करण्याची शेवटती तारीख काय आहे, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार
'या' बँकेत सुरु आहे भरती
लगेच करा अर्ज
Govt Jobs : जर तुम्ही सरकारी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) ग्रुप-हेड, टेरिटरी हेड आणि डेप्युटी मॅनेजर अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, 27 मार्चपासून अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 16 एप्रिलपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता उमेदवारांनी वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी बँकेने काही विशिष्ट निकष निश्चित केले आहेत. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे. याशिवाय, संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (Masters) किंवा मॅनेजमेंटमधील डिप्लोमा असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेबाबत बोलायचे झाले तर, पदानुसार किमान वय विविध प्रवर्गांनिसार 24, 27 आणि 31 वर्षे निश्चित करण्यात आले आहे, तर कमाल वयोमर्यादा 35, 40 आणि 45 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल; यामध्ये SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सवलत मिळेल.
हे ही वाचा : 'त्या' बंद दरवाजाचे गूढ, महाराष्ट्रातील 'या' सरकारी इमारतीचा पश्चिम दरवाजा का असतो बंद?
अर्जाचे शुल्क
या भरतीसाठी जनरल, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि दिव्यांग (PwD) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.









