पुणे : राम जन्मोत्सव मिरवणुकीदरम्यान, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने महिलेचा मृत्यू
Pune news : पुण्यातील ससाणे नगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डीजेच्या अति तीव्र आजाराने एका ज्येष्ठ महिलेचा मृत झाल्याची घटना समोर आली. या घटनेनं उत्सवामध्ये ध्वनी प्रदूषण आणि सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मिरवणुकीदरम्यान महिलेचा मृत्यू
मिरवणुकीत मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी
Pune News : आदित्य भावार - पुण्यातील ससाणे नगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डीजेच्या तीव्र आवाजाने एका ज्येष्ठ महिलेचा मृत झाल्याची घटना आहे. या घटनेनं उत्सवात ध्वनी प्रदूषण आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. संबंधित प्रकरणात मृत महिलेचं नाव रंजना रवींद्र जाधव (वय 65) असे आहे. मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : नागपूर : रेल्वे रुग्णालयात लोको पायलटने गळफास घेत संपवलं जीवन, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मिरवणुकीदरम्यान महिलेचा मृत्यू
घडलेल्या घटनेनुसार, परिसरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत डीजेचा आवाज सुरु होता. हिच मिरवणूक बघण्यासाठी रंजना जाधव घरातील काम आटोपून रस्त्यावर आल्या होत्या. मात्र, काही वेळानंतर त्यांच्या छातीत वेदना झाल्या, नंतर त्या अचानकपणे जमिनीवर कोसळल्या.
मिरवणुकीत मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी
डीजेच्या आवाजाने त्यांनी मदतीसाठी आरोळ्या ठोकल्या पण त्याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही. सोबतीला असलेल्या महिलांना संबंधित प्रकरणाची बाब लक्षात आली असता, त्यांनी मदतीसाठी हालचाल केली. जाधव यांना तातडीने रुग्णालयात रिक्षातून पाठवण्यात आले होते. दरम्यान, मिरवणुकीत मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली, यामुळे रुग्णालयात जाणं कठीण होऊन बसलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तपासणी केली आणि अशातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
हे ही वाचा : मोठी बातमी.. चाकणकरांना खरात प्रकरण प्रचंड भोवलं, दिला सलग दुसरा राजीनामा! म्हणाल्या, ‘मी सकाळी सुनेत्रा वहिनींसोबत…’
मृत महिलेचा मुलगा सौरभ जाधव यांनी डीजेच्या अति आवाजामुळे आईला मोठा त्रास होऊन तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यांनी सांगितलं की, घटनास्थळी पोलीस असूनही त्यांनी ध्वनीच्या आवाजावर कोणतेही नियंत्रण ठेवले नाही. तसेच वाहतूक कोंडीमुळे वेळेतच उपचार मिळू न शकल्याने हा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेनं शहरात असणाऱ्या ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची अधिक गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.









