सोलापूर : अर्ध्या तासात येतो असं सांगून घराबाहेर पडला, चौदा दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळला जिम ट्रेनरचा मृतदेह

मुंबई तक

सोलापूरातील एका जीम ट्रेनरच्या मृत्यूने चांगलीच खळबळ माजली आहे. भाजी बनवून ठेव असं बायकोला सांगून तो चौदा दिवसांपूर्वी घराबाहेर पडला होता. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता. अखेरीस कुजलेल्या अवस्थेतील त्याचा मृतदेह सापडला आहे.

ADVERTISEMENT

Solapur News
Solapur News
google news

बातम्या हायलाइट

point

अर्ध्या तासात येतो असं सांगून घराबाहेर पडला

point

चौदा दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळला जिम ट्रेनरचा मृतदेह

Solapur News, विजय बाबर : सोलापूर-विजयपूर रस्त्यावरील सैफुल भागातील झाडाझुडपांमध्ये सागवानाच्या झाडाला रबरी पाइपने गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुण जिम ट्रेनरचा मृतदेह आढळला आहे. नातेवाईकांनी त्यांचा घातपात झाल्याचा आरोप केला आहे. सचिन मच्छिंद्र माने (वय 30, रा. विजापूर नाका) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. सचिन माने हे बॉडी बिल्डर होते.

दहा ते बारा दिवसांपूर्वी ते बेपत्ता झाल्याने त्याबाबतची तक्रार कुटुंबीयांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. अर्ध्या तासात घरी येतो, असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या जीम ट्रेनरचा मृतदेह चौदा दिवसांनी सैफुलजवळील काटेरी झुडपात रबरी पाईपने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृत सचिन हा 14 मार्चपासून घरातून बेपत्ता होता.

हे ही वाचा : थोरल्या बहिणीला बॉयफ्रेंडसोबत शेतात पकडले, नंतर धाकट्या बहिणीसोबत घडलं भयंकर

अर्ध्या तासात घरी येतो, भाजी बनवून ठेव; सचिनचे शेवटचे शब्द

सचिन माने हा शनिवार, 14 मार्च रोजी पत्नी कल्याणी यांना आपण अर्ध्या तासात घरी येणार आहे, तोपर्यंत कैरीचे लोणचे आणि भाजी बनव, असे सांगून गेला. घरातून गेल्यापासून त्याचा मोबाईल बंद होता. सचिनच्या पश्चात पत्नी कल्याणी, तीन वर्षांची मुलगी ओजस्वी, दीड वर्षांचा मुलगा पार्थ आहेत. सचिनचे मोबाईल शॉपीचे दुकान होते. शिवाय जीम ट्रेनर असल्याने त्याचे अनेक प्रशिक्षणार्थी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. प्राथमिक अहवालामध्ये गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे आढळले आहे. याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा : बारामतीच्या महिलेचा कर्नाटकात मर्डर, जोडीने निघाले होते गाणगापूरला, वाटेत नवऱ्यासोबत बिनसले अन्..

कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, वस्तूवरून पटली ओळख

सोलापूर विजयपूर मार्गावरील झाडाझुडपातील सागवानाच्या झाडाला रबरी पाइपने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकांनी तेथे धाव घेऊन परिसरात असलेल्या सचिन यांच्या मोबाइल व अन्य वस्तूंवरून तो मृतदेह सचिन यांचाच असल्याची खात्री पटली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विजापूर नाका पोलिसांनी तेथे धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. शासकीय रुग्णालयात सचिन यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त केला व आम्हाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. एका महिलेसह तिघांनी सचिन यांचा घातपात केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
 

हे वाचलं का?