वाशिम : घराच्या अंगणातच अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुण करत होता अत्याचार, मुलीच्या वडिलांनी बघताच..
वाशिम जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 19 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, त्या मुलीच्या घराच्या अंगणातच हा प्रकार घडला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वाशिम : घराच्या अंगणातच अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुण करत होता अत्याचार
मुलीच्या वडिलांनी बघताच..
Washim Crime, ज़का खान : वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खानापूर गावात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अंगणातच मुलीसोबत..
मिळालेल्या माहितीनुसार, 28 मार्चच्या रात्री पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह जेवण करून झोपण्याच्या तयारीत होती. रात्री 11 वाजेच्या सुमारास मुलीच्या भावाच्या लक्षात आले की त्याची बहीण खोलीत नाही. त्यानंतर वडिलांनी मुलासह मुलीचा शोध सुरू केला असता, घराच्या अंगणातच त्यांना मुलगी जमिनीवर पडलेली दिसली आणि तिच्यासोबत एक तरुण संशयास्पद अवस्थेत आढळून आला.
हे ही वाचा : डॉक्टरने चोरुन काढले नर्सचे आक्षेपार्ह फोटो अन् त्यानंतर तब्बल तीन वर्ष नर्ससोबत घडलं भयानक
शेजारच्या गावातील तरुण
मुलीच्या वडिलांनी आरडाओरडा करताच तो तरुण तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. वडिलांनी जेव्हा आपल्या मुलीकडे चौकशी केली, तेव्हा तिने सांगितले की तो तरुण शेजारच्या गावातील ओळखीचा असून तिला भेटायला आला होता, मात्र त्याने तिच्यासोबत जबरदस्ती केली. या धक्कादायक माहितीनंतर वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.









