Maharashtra Weather : राज्यात वारं फिरलं, 'या' जिल्ह्यांत अवकाळी पाऊस घालणार थैमान, हवामानाचा अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात सध्या वातावरणात लक्षणीय बदल घडताना दिसून येत आहे. अशातच हवामान विभागाने राज्यातील 7 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात सध्या वातावरणात लक्षणीय बदल
हवामान विभागाने राज्यातील 7 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला
Maharashtra Weather : राज्यात सध्या वातावरणात लक्षणीय बदल घडताना दिसून येत आहे. अशातच हवामान विभागाने राज्यातील 7 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच काही भागांत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. तसेच या अचानकपणे बदलणाऱ्या वातावरणाने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जाणून घेऊयात 5 एप्रिल 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.
हे ही वाचा : नवऱ्याने रागाच्या भरात बायकोचा गळा चिरला, नंतर रात्रभर बायकोच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला, पुढे... भयंकर कांड
कोकण
कोकण मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज जारी केला आहे. तसेच आर्द्रता अधिक असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.
मध्य महाराष्ट्र
कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांत वातावरणात बदल घडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग वाढून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यात कोणताही अलर्ट जारी केला नाही. मात्र, काही भागांत वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळण्याची अधिक शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला. याच विभागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज जारी केला. जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता आहे.









