नाशिक हादरले! दिंडोरीत भीषण अपघात, कार विहिरीत कोसळून 6 मुलांसह 9 जणांचा दुर्दैवी अंत

नाशिकच्या दिंडोरी परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका कार्यक्रमातून परतत असताना कार चालकाचे नियंत्रण सुटून कार विहिरीत कोसळली. यामध्ये 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला असून मृतांमध्ये सहा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

Nashik Accident News

Nashik Accident News

मुंबई तक

04 Apr 2026 (अपडेटेड: 04 Apr 2026, 09:11 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नाशिक हादरले!

point

दिंडोरीत भीषण अपघात

point

कार विहिरीत कोसळून 6 मुलांसह 9 जणांचा दुर्दैवी अंत

Nashik Accident News, प्रविण ठाकरे : शहरातील शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी (3 एप्रिल) रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात घडला. मारुती एक्स एल ही कार विहिरीत कोसळून 'इंदोरे' गावातील दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजीनगर येथील राजे बँक्वेट हॉलमध्ये वडजे क्लासेस यांच्या वतीने स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनासाठी इंदोरे येथील सुनील दत्तात्रेय दरगोडे हे आपल्या कुटुंबतील मुलांना घेऊन आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर दरगोडे कुटुंबीय कारने घरी परतत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याशेजारील पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली.

हे वाचलं का?

मदतकार्यात मोठे अडथळे

अपघाताची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, नगरपंचायतीचे अग्निशामक दल, पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. दोन क्रेनच्या सहाय्याने मध्यरात्री गाडी बाहेर काढण्यात आली. या दुर्घटनेत गाडीतून 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर एक मुलगी गाडीतून बाहेर पडून विहिरीत बुडाल्याने तिचा मृतदेह शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

हे ही वाचा : सूर्य करणार मेष राशीत प्रवेश, 14 एप्रिल पासून तुमचे भाग्य उजळणार की अडचणी वाढणार? काय सांगते तुमची रास?

या अपघातात मृत्यू झालेल्यांची माहिती पुढीलप्रमाणे 

सुनील दत्तात्रेय दरगोडे (वय 34) यांच्यासह त्यांच्या पत्नी रेशमा सुनील दरगोडे (30), मुलगी राखी उर्फ गुणवंती (10) आणि दोन पुतण्या माधुरी अनिल दरगोडे (13) व श्रावणी अनिल दरगोडे (11) यांचा समावेश आहे. तसेच आशा अनिल दरगोडे (32) यांच्यासह त्यांचा मुलगा श्रेयश अनिल दरगोडे (11), मुलगी श्रुष्टी अनिल दरगोडे (14) आणि पुतणी समृद्धी राजेश दरगोडे (7) यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा : Personal Finance: मार्केटमध्ये उलथापालथ चालू असताना SIP सुरू ठेवावी की बंद करावी?

उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला

घटनास्थळी एनडीआरएफची टीमही दाखल झाली होती. संपूर्ण बचावकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. स्नेहसंमेलनासाठी परिधान केलेले वेशभूषेतील लहान मुलांचे मृतदेह पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. दिंडोरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.