महाराष्ट्र : लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या 22 वर्षाच्या प्रियकराचे कांड, 29 वर्षीय विवाहित प्रेयसीला संपवले

चंद्रपूरमध्ये एका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये 29 वर्षीय प्रियंका वांढरे यांचा मृत्यू झाला आहे.

Chandrapur Crime

Chandrapur Crime

मुंबई तक

04 Apr 2026 (अपडेटेड: 04 Apr 2026, 01:11 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 22 वर्षाच्या प्रियकराचे कांड

point

29 वर्षीय विवाहित प्रेयसीला संपवले

Chandrapur Crime, विकास राजूरकर : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका 22 वर्षीय तरुणाने आपल्यापेक्षा सात वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रेयसीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने या हत्येला आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, घटनेच्या 20 दिवसांनंतर आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने हत्येचा उलगडा केला असून, दुर्गापूर पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

हे वाचलं का?

वयाने लहान असलेल्या प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिप

प्रियंका वांढरे (29, रा. तुकुम) असे मृत महिलेचे नाव असून, अंकेश योगेश बहिरवार (22, रा. सोनापुर, ता. सावली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका ही आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. याच काळात तिची ओळख अंकेशसोबत झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघेही प्रियंकाच्या घराच्या वरच्या मजल्यावर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वारंवार खटके उडत होते.

हे ही वाचा : नांदेड तिहेरी हत्याकांडाने हादरले, भावाच्या मर्डरचा बदला घेण्यासाठी 2 खून, एकाला रुग्णालयात घुसून केले ठार

प्रियकरावर नियंत्रण ठेवायची प्रियंका

पोलिस तपासात समोर आले की, प्रियंका ही अंकेशवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायची आणि त्याला त्याच्या कुटुंबीयांशी बोलण्यापासून रोखायची. याच सततच्या वादाला कंटाळून 14 मार्च रोजी रात्री 8 च्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात अंकेशने मोबाईल चार्जरच्या वायरने प्रियंकाचा गळा आवळून तिचा जीव घेतला. त्यानंतर घाबरलेल्या अंकेशने प्रियंकाच्या वडिलांना फोन करून ती बेशुद्ध पडल्याचे आणि तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. नातेवाईकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हे ही वाचा : पुणे : आळंदीत दुहेरी हत्याकांड, घरात घुसून वृद्ध महिलेसह चिमुरडीची हत्या; नेमकं कारण काय?

पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये माहिती समोर

सुरुवातीला ही घटना आत्महत्येची वाटत असली तरी, 3 एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या पोस्ट मार्टम अहवालात गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. आयपीएस गौरव कार्यादे पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अंकेशची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेला चार्जर आणि एक्सटेंशन बोर्ड जप्त केला असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103 (1) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.