मुंबईची खबर: आता ट्रॅफिकचं नो टेन्शन! मुंबईतील 'या' भागात बनणार 7 फ्लायओव्हर्स, राज्य सरकारने...

मुंबईतील वसई-विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शहरात 7 उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फ्लायओव्हर्सच्या बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील 'या' भागात बनणार 7 फ्लायओव्हर्स, राज्य सरकारने...

मुंबईतील 'या' भागात बनणार 7 फ्लायओव्हर्स, राज्य सरकारने...

मुंबई तक

• 05:35 PM • 27 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील 'या' भागात बनणार 7 फ्लायओव्हर्स

point

उड्डाणपुलाच्या बांधणीसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय

Mumbai News: मुंबईतील वसई-विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शहरात 7 उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या उड्डाणपुलांवर खर्च करण्यासाठी महापालिकेने MMRDA कडे बजेटचा प्रस्ताव देखील पाठवला होता. एमएमआरडीएने यासाठी वर्षभरापूर्वी निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, भूसंपादन आणि निधीअभावी हे काम रखडलं होतं. अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून फ्लायओव्हर्स निर्मितीचं काम पूर्ण झाल्यानंतर वसई-विरार शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचलं का?

वसई-विरारचे क्षेत्रफळ 380 चौरस किलोमीटर आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नवीन वस्त्या विकसित होत असून वेगानं शहरीकरण होत आहे. या शहराची लोकसंख्या तीस लाखांच्या पुढे गेली आहे. मात्र, शहरातील रस्ते अरुंद असून वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. याच कारणामुळे शहरातील लोकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. 

'या' मार्गांवर जास्त वाहतूक कोंडी

वसई, नालासोपारा आणि विरार (पूर्व) ते पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गांवर जास्त ट्रॅफिक असल्याचं पाहायला मिळतं. शहरातील वाहतूक कोंडीविषयी जाणून घेण्यासाठी मेसर्स टंडन अँड कंपनीने एक सर्वेक्षण केलं. कंपनीने शहरातील रस्ते, वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा अभ्यास करुन एक रिपोर्ट सादर केला.

हे ही वाचा: पुण्यात खळबळ! पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना अटक!

भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन मुख्य जंक्शन आणि रस्त्यांवर 12 उड्डाणपूल बांधण्याची गरज व्यक्त करण्यात आली.याचा विचार करुन महानगरपालिकेने 2014-15 मध्ये 12 उड्डाणपुलांसाठी पहिला प्रस्ताव पाठवला, परंतु तेव्हापासून बजेटअभावी हे काम रखडलं आहे. लोकांच्या वारंवार मागणीनंतर महानगरपालिकेने पुन्हा प्रस्ताव पाठवला आणि ऑगस्ट 2024 मध्ये प्रस्तावित फ्लायओव्हर्सच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला.

हे ही वाचा: Govt Job: इंडियन आर्मीमध्ये लेखी परीक्षेशिवाय थेट भरती... कधीपर्यंत कराल अर्ज?

12 उड्डाणपुलांपैकी तीन फ्लायओव्हर्स एकमेकांशी जोडली जातील आणि दोन उड्डापणपुलांचं रेल्वे फ्लायओव्हर्समध्ये रुपांतर करण्यात येईल. यामुळे एकूण फ्लायओव्हर्सची संख्या 7 झाली आहे. MMRDA च्या अधिकाऱ्यांनी वसई-विरार शहराचा दौरा केला असता आणि फ्लायओव्हर्सच्या बांधकामाचं निरीक्षण केल्यानंतर फ्लायओव्हर्सच्या डिझाइनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला घेण्यात आला. 

'या' भागांमध्ये बनणार फ्लायओव्हर्स   

1. बोलिंज - साइंस गार्डन (विरार)
2. मनवेल पाडा -फुलपाडा (विरार)
3. वसंत नगरी एवर शाइन सिटी (वसई)
4. माणिकपुर - बभोला नाका (वसई)
5. चंदन नाका (नालासोपारा)
6. रेंज कार्यालय (गोखिवरे, वसई)
7. पाटणकर पार्क - लक्ष्मी शॉपिंग सेंटर (नालासोपारा)


 

    follow whatsapp