महिलांच्या 'त्या' अ‍ॅपमध्ये पुरुषांबद्दल सीक्रेट चॅट्स; पण हॅक झालं अन् 72,000 हजार फोटो...

महिलांसाठी बनवण्यात आलेला टी अ‍ॅप (Tea Dating App) हॅक करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, हॅकर्सनी हे अॅप हॅक केलं असून त्यातून पुरुषांचे 72,000 फोटो चोरल्याची माहिती समोर आली आहे.

महिलांच्या 'त्या' अ‍ॅपमध्ये पुरुषांबद्दल सीक्रेट चॅट्स; पण हॅक झालं अन्...

महिलांच्या 'त्या' अ‍ॅपमध्ये पुरुषांबद्दल सीक्रेट चॅट्स; पण हॅक झालं अन्...

मुंबई तक

• 01:04 PM • 27 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलांसाठीच्या त्या अॅपपमध्ये पुरुषांबद्दल रंगायची चर्चा

point

अॅप हॅक झालं अन् 72,000 हजार फोटोंची चोरी..

Tea dating app hacking: महिलांसाठी बनवण्यात आलेला टी अॅप (Tea Dating App) हॅक करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. हा डेटिंगसाठी सल्ला देणारा प्लॅटफॉर्म असून यावर महिला पुरुषांबद्दल सीक्रेट्स बाबी शेअर करायच्या आणि पुरुषांचे फोटो सुद्धा अपलोड करायच्या. महिला अॅपमध्ये पुरुषांना सर्च करायच्या आणि डेटिंगसाठी एकमेकींना त्याबद्दल सल्ला देत होत्या. रिपोर्ट्सनुसार, हॅकर्सनी हे अॅप हॅक केलं असून त्यातून पुरुषांचे 72,000 फोटो चोरल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या मते, चोरलेल्या फोटोंपैकी 13,000 फोटो व्हेरिफिकेशनसाठी घेण्यात आले होते. माहिती हॅक झाल्यामुळे महिलांच्या प्रायव्हसीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

हे वाचलं का?

पुरुषांबद्दल रंगायची चर्चा...

अमेरिकेत या अॅपचा वापर केला जात होता. एनबीसीच्या रिपोर्टनुसार, महिला अॅपमध्ये पुरुषांची नावे टाकून त्यांना सर्च करु शकत होत्या. कोणता पुरूष योग्य आणि कोणता नाही, याबद्दल महिलांमध्ये चर्चा देखील व्हायची. त्यांच्यासाठी रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग असे शब्द वापरले जात होते. रेड फ्लॅग म्हणजे धोक्याची घंटा आणि ग्रीन फ्लॅग म्हणजे सर्वकाही ठीक आहे. अलिकडच्या काळात, हे अॅपल अॅप स्टोअरवर सर्वाधिक डाउनलोड केलेले मोफत अॅप बनलं आहे. कंपनीच्या मते, एका आठवड्यात 10 लाख लोकांनी अॅपसाठी साइन अप केलं होतं.

हे ही वाचा: आत्याच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध, पतीला गोळ्या घातल्या अन्... 1100 किमी दूर हॉटेलमधून अटक

महिलांच्या गोपनीयतेकडे विशेष लक्ष

टी-अॅपवर यूजर्सना व्हेरिफिकेशनसाठी त्यांचे सेल्फी सबमिट करावे लागत होते. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सेल्फी हटवण्यात येत असल्याचा कंपनीने दावा केला. या अ‍ॅपने महिलांच्या गोपनीयतेकडे विशेष लक्ष दिलं होतं. यूजर्सना व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती सार्वजनिक केली जाणार नसल्याचा देखील दावा करण्यात आला होता. अॅपमध्ये स्क्रीनशॉट सुद्धा ब्लॉक केले गेले होते. परंतु आता या अॅपमधील माहिती म्हणजेच डेटाच हॅक झाला असल्यामुळे यूजर्सना मोठा धक्का बसला आहे. 

हे ही वाचा: धक्कादायक! शाळेच्या चौथ्या मजल्यावरुन मारली उडी... 10 वीच्या विद्यार्थीनीने स्वत:ला संपवलं

अॅपचा डेटाबेस अॅक्सेस

मिळालेल्या माहितीनुसार, हॅकर्सनी अॅपच्या दोन वर्षांहून अधिक जुना डेटाबेस अॅक्सेस केला असून या अॅपविरोधात एक मोहीम सुरू करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. 'हॅक करो, लीक करो' नावाच्या मोहिमेअंतर्गत, एका यूजरने एक लिंक पोस्ट केली आणि चोरीला गेलेले इमेज डेटाबेस डाउनलोड करण्याबद्दल माहिती दिली. अ‍ॅपच्या यूजर्सचं लोकेशन दर्शवणारा एक नकाशा देखील तयार करुन तो शेअर केला गेला. त्यांची नावं आणि इतर माहिती अद्याप उघड झालेली नाही. कंपनी त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्याचं काम करत आहे.

    follow whatsapp