नाशिक : पत्नीचं अफेअर असल्याचा संशय, पतीने बुटाच्या लेसने गळा आवळला; जागेवर संपवलं

Nashik Crime : गुरुवारी दुपारच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर नितीनने मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत शीतलचा गळा लेसने आवळून तिचा जीव घेतला, असा तपास पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात केला आहे.

Nashik Crime

Nashik Crime

मुंबई तक

12 Dec 2025 (अपडेटेड: 12 Dec 2025, 09:28 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नाशिक : पत्नीचं अफेअर असल्याचा संशय

point

पतीने बुटाच्या लेसने गळा आवळला; जागेवर संपवलं

Nashik Crime : नाशिकच्या पंचवटी परिसरात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्निची हत्या केल्याची हादरवून सोडणारी घटना गुरुवारी (11 डिसेंबर) उघडकीस आली. या प्रकरणात संशयित पती नितीन उत्तम भामरे याने मद्यधुंद अवस्थेत बुटाच्या लेसचा वापर करून पत्नी शीतल भामरे हिचा गळा आवळून खून करून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पंचवटी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

हे वाचलं का?

भामरे दाम्पत्य पंचवटीतील ढिकले वाचनालयाच्या रस्त्यावर कुटुंबासह वास्तव्यास होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर नितीनने मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत शीतलचा गळा लेसने आवळून तिचा जीव घेतला, असा तपास पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात केला आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर घराचा दरवाजा बाहेरून कुलूप लावले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील आणि संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचवटी पोलिस ठाण्यात नितीन भामरेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्या शोधासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा : पुणे : आरोपी बंडू आंदेकर पुणे महापालिका निवडणूक लढवणार, न्यायालयानं दिला महत्त्वाचा निर्णय

सासू-सासऱ्यांनी तोडला दरवाजा

गुरुवारी दुपारी शीतलची सासू, सासरे आणि नणंद घरी आले असता घराला बाहेरून कुलूप लावलेले दिसले. शीतल कामानिमित्त गोदाकाठी गेली असावी, या विचाराने त्यांनी तेथेसुद्धा चौकशी केली; परंतु ती तेथे दिसली नाही. यानंतर तिच्या मोबाइलवर कॉल केला असता फोनची रिंग घराच्या आतून येत असल्याचे त्यांना जाणवले. संशय आल्याने त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने घराचे कुलूप तोडले. आत प्रवेश करताच शीतल पलंगावर निश्चल अवस्थेत आढळली. लगेच पोलिसांना घटना कळवण्यात आली. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंचवटी पोलिसांनी पुढील तपासाला गती दिली आहे.

या प्रकरणामुळे पंचवटी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पती-पत्नीतील वादातून उद्भवलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

"धारावीत बदल होईल... आधी आम्ही लोकांना घरांच्या चाव्या देऊ आणि नंतरच...', प्रणव अदानींचं मोठं विधान

    follow whatsapp