बायकोला खुश ठेवण्यासाठी काय करायचं? प्रेमानंद महाराजांचं सविस्तर उत्तर, 'या' चार गोष्टी कराच

Premanand Maharaj : महाराजांनी अधोरेखित केलेलं सर्वात महत्त्वाचं तत्त्व म्हणजे एकनिष्ठता. ते स्पष्टपणे सांगतात की, कितीही सुखसोयी दिल्या किंवा कितीही प्रेम दाखवलं, तरी पतीचे अन्य स्त्रीशी संबंध असतील तर पत्नीला कधीच शांतता मिळत नाही.

Premanand Maharaj

Premanand Maharaj

मुंबई तक

11 Dec 2025 (अपडेटेड: 11 Dec 2025, 04:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बायकोला खुश ठेवण्यासाठी काय करायचं?

point

प्रेमानंद महाराजांचं सविस्तर उत्तर, 'या' चार गोष्टी कराच

Premanand Maharaj : आजच्या वेगवान आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत पती-पत्नीच्या नात्यात प्रेम, शांतता आणि आपुलकी जपणे अनेक दाम्पत्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. ‘पत्नीला नेहमी आनंदी ठेवण्यासाठी नेमकं काय करावं?’ हा प्रश्न अनेक पुरुष विचारत असतात. या प्रश्नाचं उत्तर प्रसिद्ध आध्यात्मिक विचारवंत प्रेमानंद महाराज यांनी अतिशय साध्या, पण प्रभावी शब्दांत दिलं आहे.

हे वाचलं का?

प्रेमानंद महाराज म्हणतात की, “मी गृहस्थाश्रमात नाही, त्यामुळे पती-पत्नीच्या व्यवहारातील अनुभव माझ्याकडे नाही. पण शास्त्र आणि अध्यात्म या दोन्हींच्या आधारावर वैवाहिक जीवनात आनंद टिकवणारे काही नियम मात्र स्पष्ट सांगता येतात.” त्यांनी सांगितलेली ही तत्त्वे कोणत्याही वैवाहिक नात्याला मजबूत आणि शांततेने परिपूर्ण करणारी ठरतात.

1) पत्नीच्या इच्छांचा आदर – सुखी नात्याचं पहिलं तत्त्व

महाराजांच्या मते, पत्नीला आनंदी ठेवण्याचा सर्वात मूलभूत नियम म्हणजे तिच्या इच्छांना आणि भावनांना महत्त्व देणे. पत्नीच्या छोट्या-मोठ्या अपेक्षा पूर्ण केल्या, तिचं मत ऐकलं आणि तिच्या मनाविरुद्ध कोणतंही वागणं टाळलं, तर नातं सहज गोड होतं. पत्नीच्या इच्छा पूर्ण करणे म्हणजे फक्त कर्तव्य नव्हे, तर तिच्याप्रती दाखवलेला आदर आणि प्रेम आहे. जेव्हा पती तिच्या भावनांना स्थान देतो, तेव्हा पत्नीच्या मनात विश्वास वाढतो आणि नात्यात सहज सौहार्द निर्माण होतं.

हेही वाचा : Govt Job: 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी भरती अन्... कधीपर्यंत कराल अप्लाय?

2) निष्ठा – वैवाहिक जीवनाचा पाया

महाराजांनी अधोरेखित केलेलं सर्वात महत्त्वाचं तत्त्व म्हणजे एकनिष्ठता. ते स्पष्टपणे सांगतात की, कितीही सुखसोयी दिल्या किंवा कितीही प्रेम दाखवलं, तरी पतीचे अन्य स्त्रीशी संबंध असतील तर पत्नीला कधीच शांतता मिळत नाही. परस्त्रीसंबंध कोणत्याही नात्याचा पाया कोसळवतात. त्यामुळे वैवाहिक नात्यातील आनंद टिकवण्याचा सर्वोच्च नियम म्हणजे पत्नीशी शंभर टक्के निष्ठावान राहणे.

3) पत्नीला देवरूप मानून आदर द्या

महाराज सांगतात की, पत्नी केवळ सहचारिणी नसून तिच्याकडे ‘देवत्वाने’ पाहण्याची वृत्ती ठेवली, तर घरात शांतता आणि प्रेम वाढते.तिच्या स्वभावात चिडचिड वा राग असेल, तरी त्यावर तितकाच रागाने उत्तर देऊ नये. पतीने संयम, प्रेम आणि समजुतीने परिस्थिती हाताळली तर पत्नीही लगेच शांत होते आणि नातं अधिक गहिरे होतं. सहनशीलता आणि प्रेमभाव हे वैवाहिक जीवन सुकर करणारे गुण आहेत.

4) कुठलाही जादूमंत्र नाही – श्रद्धा, निष्ठा आणि प्रेम हाच उपाय

प्रेमानंद महाराज म्हणतात की, “बायकोला आनंदी ठेवण्यासाठी बाजारात मिळणारे दागिने, रत्ने, उपाय किंवा कुठलेही जादूचे मंत्र काम करत नाहीत.” पत्नीच्या मनात आनंद टिकवण्याचा एकमेव खरा मार्ग म्हणजे तिच्या भावनांचा आदर करणे.. नितांत निष्ठा प्रेम आणि समर्पण... जे पती पत्नीचा पूर्ण आदर करतात आणि एकनिष्ठ राहतात, त्यांचं वैवाहिक जीवन आपोआपच सुखी होतं. शेवटी महाराज सांगतात, “ज्याला देवाचं ज्ञान प्राप्त होतं, त्याला जगातील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. मी स्वतः गृहस्थ नसूनही शास्त्राच्या आधारावर हा ‘सुखी संसाराचा कानमंत्र’ सांगतो.”

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बीड : सातबारा दुरुस्तीसाठी तहसीलदारांची बनावट सही केली, नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल

    follow whatsapp