मुंबई : फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा whatsapp वर अर्धनग्न होऊन व्हिडीओ कॉल, अन् व्हायरलची धमकी देत लुटलं

Mumbai Crime : या महिलेने त्याच्याकडील स्क्रीन रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी सुरू केली. बदनामीची भीती वाटल्याने उद्योजकाने सुरुवातीला 15 हजार रुपये पाठवले, मात्र त्यानंतर विविध अनोळखी नंबरवरून त्याला सातत्याने धमक्या मिळू लागल्या.

Mumbai Crime

Mumbai Crime

मुंबई तक

12 Dec 2025 (अपडेटेड: 12 Dec 2025, 10:42 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : फेसबुकवर मैत्री केली, महिलेचा whatsapp वर अर्धनग्न होऊन व्हिडीओ कॉल

point

अन् व्हायरलची धमकी देत उद्योजकाला लुटलं

Mumbai Crime, मुंबई : सोशल मीडियावर वाढत चाललेल्या फसवणुकीच्या प्रकारांना आणखी एक बळी गोरेगावमध्ये मिळाला आहे. फेसबुकवर अनोळखी महिलेशी मैत्री केल्याचा मोठा फटका एका 50 वर्षीय उद्योजकाला बसला असून, त्याच्याकडून तब्बल 1.20 लाख रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑनलाईन मैत्रीपासून सुरू झालेली ही घटना हळूहळू ब्लॅकमेलिंगपर्यंत जाऊन पोहोचली आणि शेवटी पीडित उद्योजकाने पोलिसांकडे धाव घेतली.

हे वाचलं का?

प्राथमिक माहितीनुसार, पीडित उद्योजकाला काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एका अनोळखी महिलेकडून मैत्रीचा प्रस्ताव आला. सुरुवातीला साध्या संभाषणातून मैत्री वाढू लागली. पीडिताने आपला मोबाइल क्रमांक दिल्यानंतर त्या महिलेने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. काही वेळाने व्हिडिओ कॉल आला आणि या कॉलदरम्यान ती महिला अचानक अर्धनग्न अवस्थेत दिसू लागली. परिस्थिती अवघड बनल्याने उद्योजकाने तत्काळ कॉल डिसकनेक्ट केला, मात्र खरी अडचण यानंतरच सुरू झाली.

हेही वाचा : नंदुरबार: डोळ्यात अंजन घालणारं वास्तव! बाण, बांबू आणि ब्लेडने करतात प्रसूती… हो हे घडतंय तुमच्या-आमच्या महाराष्ट्रात!

या महिलेने त्याच्याकडील स्क्रीन रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी सुरू केली. बदनामीची भीती वाटल्याने उद्योजकाने सुरुवातीला 15 हजार रुपये पाठवले, मात्र त्यानंतर विविध अनोळखी नंबरवरून त्याला सातत्याने धमक्या मिळू लागल्या. काही जणांनी स्वतःला दिल्ली पोलिसातील अधिकारी असल्याचे खोटे सांगत दडपण वाढवले आणि रक्कम न दिल्यास पोलीस कारवाई तसेच सार्वजनिक बदनामी करण्याची धमकी दिली.

पीडिताने पुढील काही आठवड्यांत ब्लॅकमेलर्सना एकूण 1.20 लाख रुपये भरले. तरीही मागणी थांबली नाही. धमक्या वाढत गेल्याने आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर अखेर उद्योजकाने धाडस करून बांगूरनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी संबंधित नंबरची तपासणी सुरू केली असून, या प्रकारात कोणत्याही टोळीचा हात आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.

ऑनलाईन ब्लॅकमेलिंगच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर संपर्क ठेवताना सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच अशा प्रकारे धमक्या मिळाल्यास घाबरून पैसे देण्याऐवजी तात्काळ पोलिसांना कळवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

BJP-Shiv Sena: अमित शाहांनी कशी फिरवली चक्र? रवींद्र चव्हाणांनी झटपट ठरवली एकनाथ शिंदेंसोबत बैठक

    follow whatsapp